Flop Movies 2022: मोठे स्टार्स, बिग बजेट तरीही फ्लॉप गेले हे चित्रपट..

२०२२ या वर्षातील बॉलिवूड मधील मोठ्या कलाकारांचे फ्लॉप चित्रपट..
Big Budget Bollywood Movies That Failed At The Box office In 2022 flop movie
Big Budget Bollywood Movies That Failed At The Box office In 2022 flop moviesakal

करोनामुळे गेल्या दोन वर्षात मनोरंजन विश्वाची झालेली वाताहात यंदा काहीशी सावरताना दिसली. यंदा सर्व निर्बंध उठल्याने २०२२ च्या सुरुवातीपासूनच चित्रपटांची वाट मोकळी झाली. असे असले तरी बॉलीवुडसाठी हे वर्ष फारसे समाधानकारक नव्हते, कारण अनेक बड्या कलाकारांचे बडे सिनेमे 2022 मध्ये अक्षरशः तोंडावर आपटले. 2022 हे वर्ष लवकरच संपूर्ण नवे वर्ष सुरू होणार आहे, त्यानिमित्ताने जाणून घेऊया या वर्षातील बड्या कलाकारांचे आपटलेले चित्रपट कोणते..

(Big Budget Bollywood Movies That Failed At The Box office In 2022 flop movie)

Big Budget Bollywood Movies That Failed At The Box office In 2022 flop movie
Sharmila Tagore Birthday: अभिनय सोडा किंवा शाळा.. देखण्या शर्मिलाला शिक्षकांनी घातली होती अट

अक्षय कुमार

अक्षय कुमाराचं नाणं या वर्षी काही खणखणीत वाजलं नाही. 2022 मध्ये अक्षयचे चक्क तीन चित्रपट रिलीज झाले. 'सम्राट पृथ्वीराज', 'रक्षाबंधन' आणि 'बच्चन पांडे'.. विशेष म्हणजे हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त फ्लॉप झाले. चित्रपटाच्या बजेटपेक्षा कमाई अत्यंत कमी कमाई या चित्रपटांनी केली. म्हणूनच अक्षयने आपले बजेटही कमी केले.

सम्राट पृथ्वीराज - बजेट -१७५ करोड - कमाई ९० करोड.

रक्षाबंधन - बजेट ७० करोड - कमाई ५० करोड

बच्चन पांडे - बजेट ११० करोड - कमाई ४६ करोड.

आमीर खान

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान वर्षातुन एकच चित्रपट करतो तो चित्रपट जबरदस्त हिट होतो पण या वर्षी आमिर खानचीही जादु काही चालली नाही. "लाल सिंग चड्ढा" हा चित्रपट अत्यंत आशयपूर्ण असूनही तो वादाच्या भोवऱ्यात अडकला. 'बॉयकॉट'चा मोठा फटका या चित्रपटाला बसला. बॉक्स ऑफिसवर अपेक्षा कमी कमाई या चित्रपटाने केली.

लाल सिंग चड्ढा - बजेट १८० करोड, कमाई ६० करोड.

हेही वाचा: Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

कंगना रौणावत

नेहमीच चर्चेत असणारी धाकड गर्ल कंगना राणावतच्या ''धाकड'' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काहीच धाकड दाखवली नाही. हा चित्रपट फ्लॉप तर झालाच पण तो इतका आपटला की चित्रपटातील स्टार्सचे मानधन देखील पूर्ण करू शकला नाही.

धाकड- बजेट ८० करोड, कमाई २० करोड पेक्षा कमी.

प्रभास

बाहुबली फेम साऊथ सुपरस्टार प्रभास आणि पुजा हेगडे यांचा ''राधे श्याम'' चित्रपट तोंडावर पडला. प्रभास सारखा स्टार असुनही या चित्रपटाने जास्त कमाई केली नाही. हा चित्रपट तुफान चालेल अशी अपेक्षा होती, पण तसे प्रत्यक्षात झाले नाही.

राधे श्याम - बजेट ३५० करोड. कमाई १८४ करोड.

शाहिद कपूर

''कबीर सिंग'' सारखा हिट चित्रपट देऊन आपल्या अभिनयाने शाहिद कपूरने लोकांची मने जिंकली होती .पण ''जर्सी'' हा चित्रपट आला कधी आणि गेला कधी हेच समजले नाही. ''कबीर सिंग'' सारखा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही.

जर्सी - बजट ८० करोड, कमाई ३० करोड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com