
Sharmila Tagore Birthday: अभिनय सोडा किंवा शाळा.. देखण्या शर्मिलाला शिक्षकांनी घातली होती अट
Sharmila Tagore: पतोडी या नवाब घराच्या सुनबाई, सैफ अली खानची आई आणि आपल्या सौंदर्याने एकेकाळी बॉलीवुडला वेड लावणाऱ्या दिग्गज अभिनेत्री म्हणजे शर्मिला टागोर. शर्मिला टागोर यांच्या सौंदर्याचा आजही कुणी हात धरू शकत नाही. 70च्या दशकातले त्यांचे चित्रपट प्रेक्षक आजही विसरू शकले नाहीत. अशा शर्मिला टागोर यांचा आज वाढदिवस..आज tyaत्या वयाच्या 79 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. तयानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या शाळेतली एक खास आठवण..
(Sharmila Tagore's school principal Sharmila Tagore's told her not to act in films)
शर्मिला टागोर यांना अभिनयात येण्यात काहीही रस नव्हता, किंवा आपण कधी असे काही करू याचा विचारही त्यांनी केला नव्हता. पण त्या नशिबाने या क्षेत्रात आल्या. एकदा शाळेतून घरी परतत असताना सत्यजित रे यांनी शर्मिलाजींना पाहिलं आणि थेट त्यांचा पाठलाग केला. पुढे सत्यजित रे त्यांच्या घरी गेले शर्मिलाजींच्या वडिलांना भेटले. यांनी चित्रपटात काम करावं असा प्रस्ताव मांडला. यावेळी मुली- महिला फारशा सिनेमात काम करत नसे. पण शर्मिला यांच्या वडिलांनी अभिनय करण्यास परवानगी दिली. पण ही एवढं सोप्पं नव्हतं.
अभिनय म्हणजे काहीतर भयंकर वाईट अशी प्रतिमा असल्याने शर्मिला यांच्या शाळेने मात्र त्यांना अभिनय करण्यास नकार दिला. कारण सिनेमात काम करताना शर्मिला यांचे अभ्यासाकडे मात्र दुर्लक्ष होत गहोते. शूटिंगमुळे त्यांना दररोज शाळेत जायला जमत नसे. शर्मिला यांचा हिरॉईन असण्याचा परिणाम इतर विद्यार्थ्यांवर होऊ नये म्हणून शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांना शाळा सोडण्यास सांगितले होते.
हेही वाचा: Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?
पुढे महाविद्यालयात देखील त्यांना या अडचणींचा सामना करावा लागला. महाविद्यालयातील शिक्षकांनीदेखील त्यांना अभिनय सोड किंवा शिक्षण सोड असे सांगितले. त्यावेळी तशर्मिला शिक्षकांसोबत भांडल्या आणि रागामध्ये शिक्षकांसमोरच पुस्तकं फाडली आणि शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला.
शिक्षकांनी अडचणी आणल्या तरी वडील ठामपणे सोबत उभे होते म्हणून सत्यजित रे यांच्या 'अपूर संसार' या बंगाली सिनेमामातून वयाच्या तेराव्या वर्षात त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. नंतर एकामागून एक सहा बंगाली सिनेमांत काम केल्यानंतर हिंदी-सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. 'कश्मीर की कली' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात शर्मिला आणि शम्मी कपूर प्रमुख भूमिकेत होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला. तेव्हापासून शर्मिला यांचा सुरू झालेला प्रवास सुसाट पुढे गेला.