अनुप जलोटा आणि माझ्यात 'हेच' खरे नाते: जसलीन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

मुंबईः ‘बिग बॉस 12’च्या सीझनमध्ये पासष्ट वर्षीय भजनसम्राट अनुप जलोटा व त्याची 28 वर्षांची गर्लफ्रेण्ड जसलीन मथारू यांची प्रेमकहाणी चर्चेत आली होती. दोघेही बिग बॉसच्या घरामधून आता बाहेर पडले असून, पुन्हा त्यांच्या रिलेशनशिपबाबत चर्चा सुरू झाली. मात्र, आमच्यात फक्त गुरु-शिष्याचे नाते आहे, असे जसलीन मथारू हिने स्पष्ट केले.

मुंबईः ‘बिग बॉस 12’च्या सीझनमध्ये पासष्ट वर्षीय भजनसम्राट अनुप जलोटा व त्याची 28 वर्षांची गर्लफ्रेण्ड जसलीन मथारू यांची प्रेमकहाणी चर्चेत आली होती. दोघेही बिग बॉसच्या घरामधून आता बाहेर पडले असून, पुन्हा त्यांच्या रिलेशनशिपबाबत चर्चा सुरू झाली. मात्र, आमच्यात फक्त गुरु-शिष्याचे नाते आहे, असे जसलीन मथारू हिने स्पष्ट केले.

बिग बॉस हे स्क्रिप्टेड असून, जसलीन व माझ्या रिलेशनशिपबद्दल प्लॅन हा बिग बॉसनेच केला होता, असा आरोप जलोटा यांनी केला होता. जसलीन मथारूला या शोची ऑफर करण्यात आली होती. पण या शोमध्ये जोड्यांनाच प्रवेश असल्याने मला जसलीनसह शोमध्ये जाण्यासाठी विचारण्यात आले. आधी आम्ही गुरू-शिष्य म्हणूनच प्रवेश करणार होतो. गुरू-शिष्य म्हणून सहभागी होण्यासाठी आम्ही तयार होतो, पण तसा प्रवेश केल्यास शोमध्ये तुम्हाला लोकप्रियता मिळणार नाही. आम्ही सांगू ते मान्य करा, असे बिग बॉसकडून सांगण्यात आले. त्यांनी सांगितले की, तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात असे तुम्ही शोमध्ये जाऊन सांगायचे, त्यामुळेच शोला टीआरपी मिळेल. हे सर्व जसलीनला माहीत होते, मला ते नंतर सांगण्यात आले. म्हणून जसलीनने शोच्या प्रिमियरवेळी रिलेशनशिपबद्दल सांगितले.    

जसलीन म्हणाली, 'मी व अनुप जलोटा गुरु आणि शिष्या म्हणूनच बिग बॉसच्या घरात जाणार होतो. पण, ठरलेल्या प्लॅनमुळे शो दरम्यान रिलेशनशिपबद्दल सांगितले. त्यावेळी गंमत वाटली पण, ही गंमत इतकी अंगलट येईल, असे वाटले नव्हते. आता मी घराबाहेर पडले आहे. आता मी अनुप जलोटांची माफी मागू इच्छिते. ते माझे गुरु आहेत आणि मी त्यांची शिष्या. हेच खरे नाते आहे.'

भजनसम्राट अनुप जलोटा व जसलीन मथारू यांच्या वयामध्ये 37 वर्षांचे अंतर आहे. रिलेशनशीपबद्दलच्या खुलाशानंतर सोशल मीडियावर दोघांबाबात चर्चा सुरू झाली होती. दोघांच्या प्रेमप्रकरणामुळे बिग बॉसच्या बाराव्या मोसमाचा भाग बनून अनुप जलोटा यांनी एका अनोख्या विक्रमाची नोंद केली होती. अनुप जलोटा हे बिग बॉसच्या आतापर्यंतच्या सर्व मोसमातील सर्वाधिक मानधन घेणारे स्पर्धक ठरले होते.

जसलीनचा जन्म मुंबईमधील असून, ती गायक व अभिनेत्री आहे. तिने प्रसिद्ध गायक मिका सिंग सोबत तिन वर्ष गायक म्हणून काम केले आहे. अनुप जलोटा हे प्रसिद्ध भजनसम्राट असून, त्यांचे विविध ठिकाणी कार्यक्रम होत असतात. अनुप जलोटा यांच्याकडे जसलीन गायनाचे धडे घेत होती. यावेळी दोघांमध्ये मैत्री झाली. पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले, याबद्दलची माहिती दोघांनी बिग बॉसच्या स्टेजवर दिली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर जसलीनच्या वडिलांनाही खुलासा केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bigg Boss 12 Jasleen Matharu want apologise Anup Jalota