सलमाननं केली राखीच्या बेडची सफाई, व्हिडिओ व्हायरल

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 10 January 2021

कलर्स वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रदर्शित होणा-या भागाचा प्रोमो शेअर केला आहे. 

मुंबई -  बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा त्याच्या वेगळेपणासाठी फार प्रसिध्द आहे. तो नेहमीच वेगळ्या प्रकारच्या आयडीया सोशल मीडियावरही शेयर करत असतो. वयाची पन्नाशी पार केलेल्या सलमानचा फॅन फॉलोअर्सही लाखोंच्या घरात आहे. त्यांना नेहमीच चकित करायला त्याला फार आवडते. सतत विविध प्रकारच्या चर्चेत राहणं हा आता सलमानचा स्वभाव झाला आहे. सध्या तो बिग बॉस 14 व्या सीझनचे होस्टिंग करत आहे. ते तो गेल्या काही वर्षांपासून करत आहे.

बिग बॉसचा कार्यक्रमाचा प्रेक्षक मोठा आहे. त्याची लोकप्रियता इतकी आहे की त्या शो चा 14 वा सीझन सुरु आहे. बिग बॉसच्या घरात दररोज नवनवीन गोष्टी घडत असतात. त्यात कुणाचे रुसवे, फुगवे, भांडणे तर काहींची प्रेमकथाही या घरात फुलताना दिसून आली आहे. नुकतचं सलमाननं बिग बॉसच्या घराची साफ सफाई केली आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  हा शो वाद आणि भांडणासाठी प्रसिध्द आहे. आता  स्पर्धक निक्की तंबोळी आणि राखी सावंत यांच्यात वाद सुरु असून ते कमालीच्या टोकाला पोहचले आहेत.  पण नंतर असा काही बदल झाला की त्यात सलमान बिग बॉसच्या घरात साफसफाई करण्यासाठी गेला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

कलर्स वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रदर्शित होणा-या भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या भागामध्ये सलमान निक्की तांबोळीला राखी सावंतच्या बेडची साफसफाई का केली नाही? असा प्रश्न विचारताना दिसतो. त्यावर निक्की तिला राखीच्या बेडची साफसफाई करायची नसल्याचे सांगते. निक्कीचे उत्तर ऐकून सलमानला राग येतो आणि तो मी बिग बॉसच्या घरात येऊन ते काम करतो असे बोलतो.

हे ही वाचा: 'जेव्हा पहिल्यांदा माझ्या वडिलांना मी रडताना पाहिलं', अमिताभ यांनी शेअर केली भावूक पोस्ट​

व्हिडीओमध्ये सलमान बिग बॉसच्या घरात जाऊन साफसफाई करताना दिसत असल्याचे पाहायला मिळते. दरम्यान त्याने कोणतेही काम छोटे नाही असे म्हटले आहे. सध्या भाईजानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी कमेंट करत सलमानचे कौतुक केलं आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bigg Boss 14 bollywood bhaijan Salman Khan Inside House Cleaned Rakhi Sawant Bed