बिग बॉस: राहुल वैद्यच्या धमाकेदार एंट्रीवर गर्लफ्रेंड दिशा परमारने दिली प्रतिक्रिया

दिपाली राणे-म्हात्रे
Wednesday, 16 December 2020

राहुलला घरात घेण्यासाठी घरातील स्पर्धकांची मतं घेण्यात आली होती. यादरम्यान राहुलचं काहींनी स्वागत केलं तर काहींनी त्याला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला.

मुंबई- 'बिग बॉस सिझन १४' मध्ये अनेकदा कॅप्शनप्रमाणे सीन पलटताना दिसतोय. कधी नवीन स्पर्धक येत आहेत तर कधी जुन्या स्पर्धकांची पुन्हा एंट्री होतेय. मंगळवारच्या एपिसोडमध्ये बिग बॉसचं घर सोडून गेलेल्या राहुल वैद्यची पुन्हा एकदा एंट्री झाली आहे. राहुलला घरात घेण्यासाठी घरातील स्पर्धकांची मतं घेण्यात आली होती. यादरम्यान राहुलचं काहींनी स्वागत केलं तर काहींनी त्याला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. आता स्पर्धकांची रिऍक्शन कशीही असली तरी राहुलने पुन्हा एकदा एंट्री घेतल्याने खेळ चांगलाच मजेशीर होणार आहे.

हे ही वाचा: अभिनेत्री क्रांती रेडकरची NCB अधिकारी असलेल्या पती समीरसाठी खास पोस्ट  

राहुल वैद्यच्या या रिएंट्रीने त्याची गर्लफ्रेंड दिशा परमार देखील खुश आहे. तिने सोशल मिडियावर राहुल वैद्यसाठी स्पेशल पोस्ट लिहिली आहे. तिचं हे ट्विट सध्या ट्रेंड होतंय. या ट्विटमध्ये दिशाने लिहिलंय, हिरो आला. आता या ट्विटमध्ये दिशाने राहुलचं नाव तर घेतलं नाहीये मात्र सगळ्यांना कळून चुकलं आहे दिशा राहुलचा खेळ पाहण्यासाठी आता उत्सुक आहे. याआधी देखील दिशाकडून राहुलच्या समर्थनार्थ अनेक ट्विट्स केले आहेत.

जेव्हा कधी कोणा घरातील स्पर्धकाने राहुलसोबत तु तु मै मै करण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा सोशल मिडियावर दिशाने राहुलची बाजू मांडली आहे. खास गोष्ट म्हणजे राहुलला त्याच्या प्रपोजलचं उत्तर मिळालं आहे.

जेव्हा तो  'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडला होता तेव्हा त्याने दिशाची भेट घेतली होती आणि आता त्याला त्याचं उत्तर मिळाल्याचं कळतंय. राहुलने गर्लफ्रेंड दिशाला बिग बॉसच्या शोमध्ये असताना प्रपोज केलं होतं. त्याने दिशासोबत लग्न करणार असल्याचं म्हटलं होतं. यावर त्याला घरातील स्पर्धकांनी पाठिंबा देखील दिला होता. त्यानंतर दिशाकडून कोणतंही उत्तर न मिळाल्याने राहुलने होमसिक असल्याचं सांगत अर्ध्यातंच हा शो सोडून गेला होता.     

bigg boss 14 rahul re entry in house girlfriend disha parmar reacts tweet  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bigg boss 14 rahul re entry in house girlfriend disha parmar reacts tweet