अभिनेत्री क्रांती रेडकरची NCB अधिकारी असलेल्या पती समीरसाठी खास पोस्ट

दिपाली राणे-म्हात्रे
Tuesday, 15 December 2020

अभिनेत्री क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंसाठी नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली आहे. सोबतंच तिने त्यांच्यासोबतचा एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.

मुंबई- समीर वानखेडे हे नाव गेल्या अनेक महिन्यांपासून सतत चर्चेत आहे.  सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात जेव्हा बॉलिवूडचं ड्रग्स कनेक्शन समोर आलं तेव्हा अनेक सेलिब्रिटींवर कारवाई करणारे समीर वानखेडेच होते. बॉलिवूडचं असलेलं ड्रग्ज कनेक्शन त्यांनी उघड केलं होतं. समीर वानखेडे हे एनसीबीचे विभागीय संचालक आहेत आणि  मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरचे ते पती आहेत. अभिनेत्री क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंसाठी नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली आहे. सोबतंच तिने त्यांच्यासोबतचा एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.

हे ही वाचा: 'क्राईम पट्रोल'ची नवी होस्ट, अनुप सोनीच्या जागी दिसणार 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री  

अभिनेत्री क्रांती रेडकरने पती समीर यांच्या वाढदिवसानिमित्त ही खास पोस्ट केली आहे. तिने लिहिलंय, ‘माझ्या विश्वाचं केंद्रबिंदू असलेल्या या खास व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. ज्या व्यक्तीवर मी खूप प्रेम करते आणि त्याचा खूप आदर करते. तुझ्यासाठी माझ्या मनात काय भावना आहेत हे सांगण्यासाठी शब्द अपुरे पडतात. तुला माझ्या आयुष्यात पाठवण्यासाठी मी या विश्वाची फार आभारी आहे. नेहमी खुश राहा. तू ज्या मूल्यांच्या आधारे जीवन जगतोस, तीच तुझी खरी ताकद आहे आणि यासाठी मी तुला सलाम करते’, अशा शब्दांत क्रांतीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

यासोबतंच तिने पोस्ट केलेल्या व्हिडीओविषयी ती सांगते, ‘समीर फोटोमध्ये कधीच हसत नाहीत. आम्हा दोघांचे फोटो काढत असताना मी त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा पुरेपुर प्रयत्न करत होती आणि अखेर त्यात मी यशस्वी झाले.’ हा व्हिडिओ खरंच मजेशीर आहे.

काही दिवसांपूर्वी एनसीबीचे समीर वानखेडे आणि त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता. ड्रग्ज पेडलर्सकडून गोरेगाव या ठिकाणी हा हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर क्रांतीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित समीर वानखेडेंच्या तब्येतीविषयी माहिती दिली होती.  

kranti redkar wishes husband sameer wankhede on his birthday  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kranti redkar wishes husband sameer wankhede on his birthday