राखीला गार्डनमध्येच घातली अंघोळ; अलीनं लावला कंडिशनर 

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 27 January 2021

राखीनं सांगितलं की, मी माझ्या आयुष्यात अशाप्रकारे कधीच अंघोळ केली नाही. त्यावर राहुल तिला म्हणतो की, आज आमचं नशीब एकदम जोरावर आहे.

मुंबई - राखी कधी काय करेल याचा काही भरवसा नाही. ती कधी कुणाशी भांडते, कुणाला वाट्टेल तसे बोलते, लक्ष वेधून घेण्यासाठी स्वताचे अंग रंगवून काय घेते यामुळे ती चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासुन राखीनं बिग बॉसच्या शो मधून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता तिनं जे काही केले आहे त्यावरुन राखी काहीही करु शकते याचा प्रत्यय करुन दिला आहे. राखीच्या अशाप्रकारच्या वागण्यामुळे तिला अनेकांच्या टीकेलाही सामोरं जावं लागलं आहे. मात्र त्याला तिचा काही फरक पडलेला नाही.

बिग बॉसनं स्पर्धक राहत असलेल्या घरातील बाथरुम बंद केले आहे. त्यामुळे अंघोळ कशी करायची हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र राखीला त्याचा काही फरक पडलेला नाही. तिनं त्यावर एक उपाय शोधला आहे. तो काही साधासुधा नाही. ती अंघोळीसाठी चक्क गार्डनमध्ये गेली आहे. तिथं तिनं अंघोळ करण्याची इच्छा व्यक्त केली असून एक बादली घेऊन स्वीमिंग पूलाजवळ गेल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून राखी प्रसिध्दीत येण्यासाठी अशाप्रकारचे अनेक कारनामे करत आहे. मागे तिनं अभिनव शुक्लाला प्रपोझ करण्यासाठी आपल्या अंगावर आय लव यु असे लिहिले होते. त्यामुळे तिच्यावर टीका झाली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

राखीच्या अशाप्रकारच्या वागण्यामुळे प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन होत आहे. यावेळी राखीबरोबर राहुल वैद्य आणि अली गोनी हेही दिसून आले आहे. बिग बॉसनं स्पर्धक राहत असलेल्या घरातील बाथरुम बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राखीनं बाहेरील गार्डनमध्ये अंघोळ केली आहे. तिला अंघोळ करताना राहुल वैद्य आणि अली गोनी यांनी पाहिले. तेव्हा ते तिच्यासाठी शॅम्पु घेऊन आले. गाणी म्हणत त्यांनी राखीला शॅम्पु बाथ देण्यास सुरुवात केली. राखीला गार्डनमध्ये अंघोळ करताना पाहिल्यावर राहुल आणि अलीनं आश्चर्य व्यक्त केले होते.

सनी चिडला,लाल किल्ल्यावर झेंडा फडकावला; तुझा माझा संबंध संपला'

राखीनं सांगितलं की, मी माझ्या आयुष्यात अशाप्रकारे कधीच अंघोळ केली नाही. त्यावर राहुल तिला म्हणतो की, आज आमचं नशीब एकदम जोरावर आहे. त्यानंतर राखीनं अली गोनीला कंडिशनर लावून देण्याची विनंती केली. त्यावर अलीनं तिला कंडिशनर लावले. चॅनलनं या व्हिडिओचा प्रोमो सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्यावर प्रेक्षकांनी मोठ्या संख्येनं कमेंट केल्या आहेत. अनेकांना राहुल, अली आणि राखीचा हा मजेदार व्हिडिओ आवडला आहे. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bigg boss 14 rakhi Sawant a bath in the garden Rahul Vaidya aly goni give conditioner to her video viral