सोनालीनं कच-यात फेकलं जेवण; निक्की म्हणाली, बेशरम झाली... 

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 22 January 2021

यापूर्वीही सोनाली आणि निक्कीमध्ये जोरदार भांडणे झाली आहेत. त्य़ावेळीही सोनालीनं निक्कीच्या बेडवर असलेलं जेवण फेकून दिलं होतं.

मुंबई - बिग बॉसमध्ये सतत वेगवेगळे प्रसंग घडत असतात. त्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधले जाते. सोशल मीडियावर त्याची चर्चाही होत असते. किंबहूना चर्चा व्हावी यासाठी त्यात सहभागी झालेले स्पर्धक काही करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात. गेल्या काही दिवसांपासून स्पर्धेतील सहभागी अनेक स्पर्धकांचा लहरी, रागीटपणा समोर आला आहे. सोनालीला राग आल्यानंतर तिनं चक्क अन्न डस्टबीनमध्ये फेकून दिले.

सोनालीनं जेवण फेकून दिल्यानंतर त्यावर रुबीना आणि निक्कीलाही राग अनावर झाल्याचे दिसून आले. त्यांनी तिला चांगलेच सुनावले. बिग बॉसच्या 14 व्या सीझनची अंतिम टप्प्याकडे वाटचाल सुरु आहे. त्यात सोनाली, निक्की आणि रुबीना यांच्यात भांडणे झाली आहेत. त्यांच्यातील वाद वाढला असून त्यामुळे अनेकदा टोकाचे पाऊल उचललं आहे. आगामी काही दिवसांतही त्यांच्यातील कडाक्याची भांडणे ही प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा विषय ठरणार आहे. नव्यानं प्रदर्शित होणा-या एपिसोडमध्ये सोनालीला राग आला आहे आणि तिनं जेवण कच-याच्या डब्यात टाकून दिलं आहे. त्यामुळे रुबीना भडकली आहे. तुला जे जेवण दिले त्याचा तु अशाप्रकारे अनादर करत असशील तर ते चूकीचे आहे असे ती तिला सांगताना दिसते.

सोनालीच्या अशाप्रकारच्या कृतीवर रुबीना म्हणते, सोनालीचा व्हीआयपी नेचर आहे. त्यामुळे अनेकदा आम्हाला अडजस्ट करावे लागते. मात्र तिनं जेवणाचा केलेला अपमान ही चूकीची कृती आहे. तिनं हे सगळं तिच्या घरी जाऊन करावे. निक्कीनंही सोनालीला चांगलेच सुनावले आहे. ती म्हणाली बेशरम झाली आहेस, म्हणून असे वागत आहेस. येथे जेवायला मिळत नाही अशावेळी तु अन्न फेकून देते आहेस काय चालले आहे हे.

त्याचे असे झाले होते की. सोनाली सांगितले होते की मी काही भात खाणार नाही. आणि मी माझ्यासाठी चपाती बनवेल. मात्र त्याला अर्शीनं विरोध केला. त्यावर रागावलेल्या सोनालीनं तिला सांगितले की, एक दिवस उपाशी राहिलीस तर काय होईल, त्यावर अर्शी म्हणते, तुला राखीनं पराठे दिले आहेत. म्हणून मी म्हटलं माझ्याकडचे पण खा. आणखी काय हवे होते. दोघींमध्ये अशाप्रकारे संभाषण झाल्यानंतर सोनाली रडायला लागते. आता मी भात खाणार नाही आणि माझ्यासाठी चपातीही बनवणार नाही. असे सांगते. त्यावर अर्शी तिला मनाई करते. मग रागानं तिच्याजवळ असलेले पराठे कच-याच्या डब्यात टाकते. हे पाहिल्यावर रुबीनाला राग अनावर होतो. त्यावेळी त्यांच्यात जोरदार भांडणे व्हायला सुरुवात होते. जिथे दोनवेळच्या भाकरीसाठी लोकं किती कष्ट करतात. आणि येथे सोनालीनं चक्क अन्न फेकून दिलं याला काय म्हणावे, कळत नाही. सोनालीनं ओरडायला सुरुवात केली. ती मला कृपया घरी जाऊ द्या. अशी विनंती बिग बॉसला करते.

'पवित्राला मागणी घालण्यासाठी गेला एजाज'; तिच्या भावाला सांगितले...

यापूर्वीही सोनाली आणि निक्कीमध्ये जोरदार भांडणे झाली आहेत. त्य़ावेळीही सोनालीनं निक्कीच्या बेडवर असलेलं जेवण फेकून दिलं होतं. यावरुन तिला तिचे फॅन्सनं मोठया प्रमाणात ट्रोल केले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bigg boss 14 sonali throws food in the dustbin Rubina Nikki blast her saying besharam