
'बिग बॉस'च्या यंदाचा १४ वा सिझन देखील आता हळुहळु प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करायला लागला आहे.शोमध्ये आत्ता ११ नवीन स्पर्धक आणि तीन तुफानी सिनिअर्स आहेत. मात्र यात आणखी थोडा तडका देण्यासाठी निर्माते आता ४ नवीन स्पर्धकांची एंट्री करणार आहेत.
मुंबई- छोट्या पडद्यावरिल सगळ्यात जास्त चर्चेत असलेला शो म्हणजे 'बिग बॉस'. बिग बॉसच्या यंदाचा १४ वा सिझन देखील आता हळुहळु प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करायला लागला आहे. तुफानी सिनिअर्स म्हणजेच सिद्धार्थ शुक्ला, हिना खान आणि गौहर खान देखील शो जास्त मनोरंजक बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. टास्क दरम्यानची मस्ती आणि भांडणं यामध्ये आता एक नवीन बातमी येतेय जी बिग बॉसच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवणार आहे. शोमध्ये आत्ता ११ नवीन स्पर्धक आणि तीन तुफानी सिनिअर्स आहेत. मात्र यात आणखी थोडा तडका देण्यासाठी निर्माते आता ४ नवीन स्पर्धकांची एंट्री करणार आहेत.
'बिग बॉस १४' मध्ये येणारे दिवस आणखीन मनोरंजक होणार आहेत. दोन आठवड्यांनंतर शोमध्ये तुफानी सिनिअर्स स्पर्धकांना सांगितलं जाईल की त्यांची आता घरातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे मात्र हे खरं तर असं नसेल. तसंच 'बिग बॉस'चं घर आणखी चर्चेत राहण्यासाठी निर्माते ४ नवीन स्पर्धकांची घरात एंट्री करणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, बिग बॉसचे हे चारही नवीन स्पर्धक सध्या क्वारंटाईन आहेत.
या चार स्पर्धकांमध्ये शार्दुल पंडित, रश्मि गुप्ता, नैना सिंह यहे कन्फर्म असल्याचं कळतंय. तर चौथ्या स्पर्धकाच्या बाबतीत असा अंदाज लावला जातोय की तो पवित्रा पुनियाचा एक्स बॉयफ्रेंड प्रतीक शहजपाल असू शकतो.
दोन आठवड्यांनंतर जेव्हा सिनिअर्स शो सोडून जातील तेव्हा हा शो किती मनोरंजक होतोय हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. सोबतंच सिद्धार्थ, हिना, गोहर घरातून बाहेर आल्यानंतर शेहनाज, गौतम गुलाटी आणि प्रिंस नरुला यांची एंट्री होणार आहे.
bigg boss 14 soon 4 new contestants will enter in bb house