अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या मुलाचा शालेय प्रोजेक्ट, ८ वर्षांच्या विआनने बनवला सोनू सूदचा ऍनिमेटेड व्हिडिओ

shilpa viaan
shilpa viaan

मुंबई- अभिनेत्री शिल्पा शेट्टी कोरोनाच्या काळात कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या मुलीचे फोटो असलेल्या पोस्ट शेअर केल्या होत्या. आता तिने मुलगा विआनच्या शाळेतील प्रोजेक्ट चाहत्यांसमोर आणला आहे. या प्रोजेक्टची खास गोष्ट अशी की शिल्पाच्या मुलाने हा प्रोजेक्ट अभिनेता सोनू सूदला डेडिकेट केला आहे.

शिल्पा शेट्टीने पोस्ट केलंय की, 'विआनचा शालेय प्रोजेक्ट जो एका ख-या खु-या हिरो सोनू सूदला डेडिकेट केला आहे. मुलांच्या आसपास जे काही सुरु असतं ते त्याचं निरीक्षण करत असतात. विआनचा आत्ताचा हा शालेय प्रोजेक्ट पाहून ही गोष्ट तर आणखी स्पष्ट झाली आहे. प्रोजेक्टचा विषय होता असे लोक जे काही बदल घडवतील. गेल्या महिन्यात जे काही होत होतं ते सगळं विआन पाहत होता आणि कौतुक करत होता की माझा मित्र सोनू सूद कशा निस्वार्थी भावनेने गरजुंची मदत करत आहे.'

ती पुढे लिहिते, 'ज्या वेळी लोक घाबरुन घरात बसले होते तेव्हा त्याने स्वतःच्या भावनांचा विचार न करता लोकांचं दुःख पाहिलं. त्याने स्थलांतरित मजुरांची ज्या प्रकारे सेवा केली आहे ते विआनच्या मनात बसलं. त्यामुळे त्याने त्याच्या या ऍनिमेटेड व्हिडिओवर काम केलं ज्याची कल्पना, डबिंग, एडिटिंग, लिखाण सगळं त्याने स्वतःच केलं आहे त्याच्या हिरोच्या प्रेमापोटी. मला तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करताना खूप आनंद होत आहे. ही खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे. ( तो केवळ ८ वर्षांचा आहे.) सोनू हे केवळ तुझ्यासाठी.' शिल्पाने शेअर केलेला हा व्हिडिओ सोनूच्या चाहत्यांनाही चांगलाच पसंत पडतोय. आता यावर सोनूच्या प्रतिक्रियेची सगळेजण वाट पाहत आहेत.   

shilpa shetty post son viaans school project based on actor sonu sood  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com