esakal | बिग बॉस १५: फक्त १४ आठवड्यांसाठी सलमानला मिळाले तब्बल इतके कोटी रुपये
sakal

बोलून बातमी शोधा

Salman khan

बिग बॉस १५: फक्त १४ आठवड्यांसाठी सलमानला मिळाले तब्बल इतके कोटी रुपये

sakal_logo
By
स्वाती वेमूल

छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस'चा पंधरावा Bigg Boss 15 सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात या नव्या सिझनला सुरुवात होणार असून याचंही सूत्रसंचालन अभिनेता सलमान खान Salman Khan करणार आहे. या सिझनसाठी सलमानने त्याची फी वाढवली असून १४ आठवड्यांसाठी तो तब्बल ३५० कोटी रुपये मानधन घेत असल्याचं कळतंय. बिग बॉसच्या गेल्या ११ सिझन्सचं सूत्रसंचालन सलमाननेच केलं होतं. 'डीएनए'नं दिलेल्या रिपोर्टनुसार, टेलिव्हिजनवर सलमान हा सर्वांत महागडा सूत्रसंचालक आहे.

बिग बॉसच्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या सिझनच्या प्रत्येक एपिसोडसाठी सलमानने अडीच कोटी रुपये मानधन स्वीकारले होते. सातव्या सिझनसाठी त्याने मानधनाचा आकडा वाढवला. सातव्या सिझनच्या प्रत्येक एपिसोडसाठी त्याला पाच कोटी रुपये मानधन देण्यात आलं होतं. बिग बॉसच्या तेराव्या सिझनसाठी हा आकडा आणखी वाढला. बिग बॉस १३च्या प्रत्येक एपिसोडसाठी सलमानने १३ कोटी रुपये घेतले होते.

हेही वाचा: Bigg Boss Marathi 3: स्पर्धकांची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; पहा भन्नाट मीम्स

हेही वाचा: 'फॅमिली मॅन'मुळे समंथा-नाग चैतन्यच्या आयुष्यात घटस्फोटाचं वादळ

एपिसोडगणिक सलमानच्या मानधनाचा आकडा वाढत असून आता चौदाव्या सिझनसाठी त्याने २५ कोटी रुपये स्वीकारले आहेत. सलमानच्या सूत्रसंचालनाला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळते. त्यातही बिग बॉस हा टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. प्रत्येक सिझनमध्ये नामांकित सेलिब्रिटी यामध्ये भाग घेतात. या शोमुळे सेलिब्रिटींनाही प्रसिद्धी मिळते. बिग बॉस १५ मध्ये कोणकोणते सेलिब्रिटी सहभागी होणार आहे, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. दरम्यान 'बिग बॉस ओटीटी'ची विजेती दिव्या अगरवाल ठरली आहे. या शोचं सूत्रसंचालन निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने केलं.

loading image
go to top