'या' 17 सेलेब्सना 'Big Boss' ची ऑफर? प्रसिद्ध TV कलाकार,ग्लॅमर गर्लही यादीत Salman Khan Big Boss Show | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss 16 ,Big boss OTT-2 Contestants List 2022 With all details

'या' 17 सेलेब्सना 'Big Boss' ची ऑफर? प्रसिद्ध TV कलाकार,ग्लॅमर गर्लही यादीत

बस्स...आता प्रतिक्षा काहीच महिन्यांची आणि छोट्या पडद्यावरचा वादग्रस्त शो 'बिग बॉस'(Big boss) पुन्हा रसिकांच्या मनावर राज्य करायला येणार. सलमान खानचा(Salman Khan) रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' मध्ये कोणता मोठा सेलिब्रिटी दिसणार आहे, यावरनं आपल्या मनात देखील जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच लागून राहिली असणार. म्हणून एखादा-दुसरा नाही तर तब्बल 17 सेलिब्रिटींच्या नावाची लिस्ट घेऊन आम्ही हजर राहिलो आहोत,ज्यांना शो च्या निर्मात्यांनी 'बिग बॉस 16' ची ऑफर दिली आहे.(Bigg Boss 16 ,Big boss OTT-2 Contestants List 2022 With all details)

हेही वाचा: 'हा हिंदू देवतांचा अपमान...';'काली' सिनेमाच्या पोस्टरमुळे दिग्दर्शक संकटात'

या 17 जणांच्या नाववार अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही. सोशल मीडिया आणि हाती लागलेल्या वृत्तावरनं ही सतरा जणांची नावं समोर आली आहेत. चर्चा आहे की निर्मात्यांनी 'बिग बॉस 16' आणि 'बिग बॉस OTT- 2' साठी 17 सेलिब्रिटींशी बोलणी केली आहेत. आता त्या सेलिब्रिटींनी हो किंवा नाही नेमकं काय निर्मात्यांना कळवलं आहे याविषयी अद्याप ठोस माहिती हाती लागलेली नाही. पण शो ला हिट करण्यासाठी मेकर्सनी मात्र कंबर कसली आहे. चला जाणून घेऊया त्या 17 जणांविषयी.

हेही वाचा: 'कागज २' च्या सेटवर अनुपम खेर जखमी, एका टेबलानं केला घात...

अर्जुन बिजलानी,मुनव्वर फारुकी,दिव्यांका त्रिपाठी,शिवांगी जोशी,टिना दत्ता,अज्मा फलाह,शिवम शर्मा, जय दुधाने,मुनमुन दत्ता,कॅट क्रिस्टियन,जन्नत जुबैर,फैजल शेख,केविन अल्मासिफर,आरुषी दत्ता,पूनम पांडे,बसीर अली,जैद दरबार यांची नावे 'बिग बॉस 16' आणि बिग बॉस ओटीटी साठी समोर येत आहेत. बोललं जात आहे की निर्मात्यांची या सेलिबसोबत बोलणी सुरु आहेत. बिग बॉस 16 ला सलमान खानच होस्ट करणार हे तर ठरलं आहे. परंतु ओटीटीवर हा शो कोण होस्ट करणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं आहे. चर्चा आहे की करण जोहर 'सिझन2' होस्ट करणार नाही. हिना खान,फराह खान आणि करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाश यांची नावं देखील ओटीटी शो होस्ट करण्यासाठी समोर येत आहेत.

हेही वाचा: सुशांत सिंग राजपुतचा मृतदेह सगळ्यात आधी पाहणाऱ्या 'फ्लॅटमेट'चा जामीन मंजूर

सुरुवातीला 'बिग बॉस ओटीटी' सुरु होईल नंतर 'बिग बॉस सिझन 16'. यावेळी बिग बॉस मध्ये अर्जुन बिजलानी,पूनम पांडे येतीलच असा अंदाज वर्तवला जात आहे. टीना दत्ता,मुनमुन दत्ताला निर्मात्यांनी अप्रोच केलं आहे पण यावेळी त्या शो मध्ये येण्यास तयार होतील की नाही अशी शंका व्यक्त केली जात आहे. या सतरा जणांच्या यादीतील बरेच सेलिब हे कंगनाच्या लॉकअप शो मधील आहेत. मुनव्वर,अज्मा,पूनम पांडे,शिवम शर्मा कंगना रनौतच्या(Kangana Ranaut) 'लॉकअप' मध्ये दिसले होते, मुनव्वर तर 'लॉकअप' चा विजेता ठरला होता.

Web Title: Bigg Boss 16 Big Boss Ott 2 Contestants List 2022 With All

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top