सिनेमात काम करायचं स्वप्न पूर्ण होता होता राहिलं शिव ठाकरेचं.. 'या' कारणानं घेतला मनाविरोधात निर्णय Shiv Thakare | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Thakare

Shiv Thakare: सिनेमात काम करायचं स्वप्न पूर्ण होता होता राहिलं शिव ठाकरेचं.. 'या' कारणानं घेतला मनाविरोधात निर्णय

Shiv Thakare: 'बिग बॉस १६' मध्ये शिव ठाकरे हे नाव पूर्ण सिझनभर गाजलेलं पहायला मिळालं.त्यानं आपल्या शो मधील परफॉर्मन्सनं केवळ फायनलपर्यंत पोहचून दाखवलं नाही तर नंतर-नंतर त्याच्या नावानं बिग बॉस सिझन १६ ओळखू जाऊ लागला.

भले बिग बॉस शो आता संपलाय पण या शो ने शिव ठाकरेला खूप प्रसिद्धि दिली. शो संपल्यानंतरही शिव ठाकरे संदर्भात ऐकणं आणि त्याची एक झलक पाहणं लोकांना आवडतं. (Bigg Boss 16 fame shiv thakare turned down offers of two big films know the reason)

बॅक टू बॅक तीन रिअॅलिटी शो केल्यानंतर आता पुन्हा एकदा शिव ठाकरे स्टंट बेस्ड शो 'खतरों के खिलाडी'च्या नव्या सिझनमध्ये दिसणार आहे. शिवनं याआधीच खुलासा केला आहे की तो रोहित शेट्टीच्या शो मध्ये दिसणार आहे. पण या शो साठी शिव ठाकरेनं एक मोठी किंमत चुकवली आहे.

रोहित शेट्टीच्या रिअॅलिटी शो साठी शिव ठाकरेनं दोन मोठ्या मराठी सिनेमांच्या ऑफर्सना नकार कळवला आहे. आता प्रश्न हा उठतोय की त्यानं असं का केलं. कारण बिग बॉसच्या घरात तर त्यानं आपल्याला मोठा अभिनेता बनायचं आहे असं म्हटलं होतं.

यासंदर्भात माहिती देताना शिव ठाकरे म्हणाला की त्याला सिनेमाची ऑफर मिळाली होती पण त्यानं ती नाकारली. तो मराठीत एका बड्या दिग्दर्शकासोबत काम करणार होता. दोन्ही सिनेमाचं शूटिंग एप्रिलपासून सुरू होणार होतं. आणि मे महिन्याच्या शेवटी शूटिंग पूर्ण होणार होतं. पण त्याच्या तारखा आपसात क्लॅश होत होत्या. शिवनं 'खतरो के खिलाडी' या शो मध्ये जायचं आधीच ठरलं होतं. त्यानं कमिटमेंट दिली होती . त्यामुळे यादरम्यान त्याला कोणते नवीन प्रोजेक्ट करायचे नव्हते.

शिव ठाकरेच्या मते त्याला नेहमीच हा शो करायचा होता. कॅमेऱ्यासमोर स्वतःला पाहणं त्याला नेहमीच आवडतं आणि स्वतःला प्रेक्षकांसोबत जोडून ठेवायला देखील त्याला आवडतं. सध्या तो आपली भाषा,त्याचे उच्चार यावर लक्ष केंद्रित करून आहे. सोबत आणखी इतर गोष्टींवर देखील तो अभ्यास करत आहे.

शिव नेहमीच म्हणत आलाय की अमरावतीच्या गल्लीतून मी आज जिथे पोहोचलोय तो प्रवास सोपा नव्हता..त्यामुळे मी योग्य मार्गावर चाललोय एवढं नक्की. शिवला सिनेमे करायचे नाहीत असं नाही. हातातल्या कमिटमेंट्स पूर्ण झाल्या की तो नक्की सिनेमात काम करणार आहे.