Bigg Boss 16: बिग बॉसमध्ये यश मिळवणारी प्रियंकाला प्रेमात मात्र मिळालयं अपयश या कारणाने बॉयफ्रेंडने... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 priyanka chahar choudhary

Bigg Boss 16: बिग बॉसमध्ये यश मिळवणारी प्रियंकाला प्रेमात मात्र मिळालयं अपयश या कारणाने बॉयफ्रेंडने...

टीव्ही अभिनेत्री प्रियांका चहर चौधरी सध्या रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' मध्ये अंतिम फेरीत दिसणार आहे. ती विजेती ठरू शकते, अशी चर्चा आहे, मात्र हे अंतिम फेरीतच निश्चित होईल. फिनालेपूर्वी प्रियंका चहरने 'बिग बॉस'च्या घरातील तिच्या लव्ह लाईफशी संबंधित एक मोठा खुलासा केला आहे. ती तिच्या लव्ह लाईफबद्दल बोलली आहे.

प्रियंका चहर चौधरी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कमी बोलते. अलीकडेच प्रियांकाने खुलासा केला की, तिचे एकदा नव्हे तर तीनदा हृदय तुटले आहे. एमसी स्टॅन, शिव ठाकरे आणि प्रियांका चहर चौधरी 'बिग बॉस'च्या घराच्या लिव्हिंग रूममध्ये बसून त्यांच्या लव्ह लाईफबद्दल चर्चा करत होते.

शिवने सांगितले की, त्याचे पहिले रिलेशनशिप त्याच्यामुळे तुटले होते, पण नंतरच्या नात्यात त्याचे मन तुटले आहे. शिवाचे बोलणे ऐकून प्रियांकालाही तिचे पूर्वीचे रिलेशनशिप आठवले. तिचे हृदय तीन वेळा तुटल्याचे तिने सांगितले. तिचे बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाले कारण तिला लग्न करायचे होते.

प्रियंका म्हणाली, “जेव्हा माझे हृदय तुटले तेव्हा मी खूप रडायचे. माझे 3 वेळा हार्ट ब्रेक झाले. माझे रिलेशनशिप तुटण्याचे कारण लग्न होते, कारण मला लग्न करायचं होतं. आता जे काही घडले ते चांगल्यासाठीच झाले असे वाटते. लग्न झालं असतं तर आत्तापर्यंत मुलं झाली असती".

प्रियांका चहर चौधरीचे नाव अंकित गुप्तासोबतही जोडले गेले होते. अंकित आणि प्रियांका 'उड़ारियां'मध्ये एकत्र दिसले होते. यानंतर दोघांनीही 'बिग बॉस 16' मध्ये प्रवेश केला आणि त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली. दोघांमध्ये प्रेम दिसून आले. पण त्यांनी एकमेकांना नेहमीच मित्र समजले.