Bigg Boss 16: मनोरंजन अन् अ‍ॅक्शनचा तडका! फिनालेला स्पर्धकांवर पडणार 'बिजली'.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss 16

Bigg Boss 16: मनोरंजन अन् अ‍ॅक्शनचा तडका! फिनालेला स्पर्धकांवर पडणार 'बिजली'....

रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' आता अंतिम टप्प्यात आहे. शोचा ग्रँड फिनाले उद्या म्हणजेच 12 फेब्रुवारीला होणार आहे. घरात आता टॉप 5 स्पर्धक म्हणजे शिव ठाकरे, प्रियंका चहर चौधरी, अर्चना गौतम, शालीन भानोत आणि एमसी स्टॅन हे आहेत. आता यातूनच या पर्वाचा विजेता ठरणार आहे. आता ही ट्रॉफी कोण घरी घेऊन जाणार हे तर उद्या कळेलच. पण त्यापुर्वी घरातील स्पर्धक जाता जाता पुन्हा प्रेक्षकांच भरभरुन मनोरजंन करणार आहेत.

घरामध्ये उपस्थित असलेले टॉप 5 स्पर्धक फिनालेमध्ये दमदार परफॉर्मन्स देणार आहे. शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये शालीन भानोत आणि अर्चना गौतम डान्स करतांना दिसत आहेत. याशिवाय पहिल्यांदाच शोचा फिनाले देखील ५ तास चालणार आहे.

बिग बॉस 16 च्या प्रोमोमध्ये असे दिसून येते आहे की या रविवारी 12 फेब्रुवारी संध्याकाळी 7 वाजता, ब्लॉकबस्टर ग्रँड फिनाले होईल. या शोला त्याचा विजेता मिळेल. या प्रोमोमध्ये शालीन भानोतचा ग्रँड फिनालेच्या दिवशीचा परफॉर्मन्सही दाखवण्यात आला आहे. तो 'बिजली' गाण्यावर नाचतो. त्याचवेळी अर्चना गौतमने 'बिजली गिराणे' या गाण्यावर किचन एरियात डान्स करतांना दिसणार आहे.

ग्रँड फिनालेमध्ये हाऊसमेट्सच्या परफॉर्मन्सशिवाय सनी देओल आणि अमिषा पटेल 'गदर 2'च्या प्रमोशनसाठी येणार आहेत. कृष्णा अभिषेक त्याच्या कॉमेडीला मसाला देणार आहे. याशिवाय शोच्या शेवटच्या एपिसोडमध्ये रोहित शेट्टी घराघरात दाखल होणार आहे. सदस्यांना स्टंट करण्यासाठी सांगणार आहे. 'खतरों के खिलाडी 13' साठी ऑडिशन घेतले जाईल ज्यात शिवची निवड होईल. असाही दावा करण्यात येत आहे.

त्यामुळे आता हा सिझनचा विजेत्याचा किताब कोणाला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. स्पर्धकांचे चाहते आता आपल्या लाडक्या स्पर्धकांला जिंकवण्यासाठी भरभरुन वोटिंग करत आहे.