Bigg Boss 16: ट्रॉफी दिमाखात अमरावतीतच येणार.. Shiv Thakare च्या आईला ठाम विश्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shiv thakare, shiv thakare mother, bigg boss 16

Bigg Boss 16: ट्रॉफी दिमाखात अमरावतीतच येणार.. Shiv Thakare च्या आईला ठाम विश्वास

Bigg Boss 16 Shiv Thakare: बिग बॉस १६ आता अखेरच्या टप्प्यावर आलंय. शिव ठाकरे, एम. सी. स्टॅन, प्रियंका चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोत हे ५ जण फायनलचे मुख्य दावेदार आहे.

या ५ जणांपैकी बिग बॉस १६ च्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार हे फायनलमध्ये कळून येईलच. बिग बॉसच्या फायनलसाठी शीव ठाकरेचं नाव प्रचंड चर्चेत आहे. शिव ठाकरे बिग बॉस १६ ची ट्रॉफी जिंकणार का ? असा प्रश्न शीवच्या आईला विचारण्यात आला.

(shiv thakare will be the winner of bigg boss 16 says shiv mother)

शिव बिग बॉस १६ ची ट्रॉफी जिंकून स्वतःचं स्वप्न पूर्ण करणार का, हे अवघ्या काहीच दिवसांमध्ये स्पष्ट होईल. शिवच्या आईने याविषयी स्पष्टपणे खुलासा केलाय. शिवची आई म्हणाली,"माझा मुलगा शिव ठाकरेच बिग बॉस १६ जिंकणार.

हि ट्रॉफी शिव अमरावतीत मोठ्या दिमाखात घेऊन येईल. कारण शिवला केवळ त्याच्या फॅन्सची नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची साथ आहे." असा ठाम विश्वास शीवच्या आईने लेकावर दर्शवला आहे.

मराठमोळा शिव ठाकरे हा सध्या बिग बॉसमुळे चर्चेत आहे. शिव बिग बॉस 16 चं पर्व गाजवत आहे आणि या सिझनच्या विजेतेपदाचा तगडा दावेदारही आहे. शिवने आपल्या खेळाने सगळ्यांची मनं जिंकून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

शिवची आई सुरुवातीपासून शिवच्या स्वप्नांसाठी त्याच्यामागे ठामपणे उभी आहे. कुटुंबाच्या भक्कम सपोर्टमुळे शिव ठाकरे रोडीज आणि बिग बॉस मराठी २ मध्ये सहभागी झाला. पुढे शिवने बिग बॉस मराठी २ चं विजेतेपद पटकावलं.

बिग बॉस १६ ची ग्रँड फिनाले १२ फेब्रुवारीला कलर्स वर बघायला मिळेल. शिव आणि प्रियंका या दोघांमध्ये फायनलची चुरस बघायला मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आहे. सलमान खानच्या उपस्थितीत बिग बॉस १६ ग्रँड फिनाले आलिशान पद्धतीने रंगणार आहे.

आता टॉप ५ सदस्यांपैकी बिग बॉस १६ च्या ट्रॉफीवर शिव ठाकरे नाव कोरून आईचं स्वप्न पूर्ण करणार का, याची सर्वांना उत्सुकता आहे.

टॅग्स :Big BossShiv Thakare