Bigg Boss 16 Grand Finale: 'आणि...'बिग बॉस 16'चा महाविजेता आहे..', फिनालेपूर्वी 'तो' व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss 16 Grand Finale

Bigg Boss 16 Grand Finale: 'आणि...'बिग बॉस 16'चा महाविजेता आहे..', फिनालेपूर्वी 'तो' व्हिडिओ व्हायरल

'बिग बॉस 16'चा आज शेवटचा दिवस आहे. बघता बघता 4 महिने पुर्ण झाले. घरातील सदस्यांनी प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केले. या सिझनमध्ये आपण बरेच राडे, वाद पाहिले, त्याचबरोबर प्रेम आणि मैत्रीही पाहिली. घरतील मंडली तर सर्वांचीच लोकप्रिय झाली. आज शोचा फिनाले आहे. शो च्या ग्रॅंड फिनालेत सध्या टॉप 5 मध्ये प्रियंका चहर चौधरी, शिव ठाकरे,एम सी स्टॅन,अर्चना गौतम आणि शालिन भनोट.

ट्रॉफीसाठी शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी आणि एमसी स्टेन यांच्यात चुरशीची लढाई होईल असं अपेक्षित आहे. पण आता काही सांगणे कठीण असतांनाच. कोण विजेता आणि कोण उपविजेता, काही तासातच कळणार आहे. मात्र याच बिग बॉस विजेत्याचा एक व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत शिव ठाकरे याने 'बिग बॉस 16'चा सिझन जिंकल्याचा दावा करण्यात येत आहे. खरं तर हा व्हिडिओ 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या सीझनचा आहे जो शिव ठाकरेने जिंकला होता. व्हिडिओमध्ये होस्ट महेश मांजरेकर शिव ठाकरे आणि नेहा शितोळे यांचा हात धरून स्टेजवर उभे आहेत. विजेत्याचे नाव जाहीर होण्याची प्रत्येकाला प्रतीक्षा असतांनाच महेश मांजरेकर यांनी शिव ठाकरे यांचे नाव विजेते म्हणून घोषित केले. शिवाचे नाव ऐकताच त्याला धक्का बसतो. तो त्याचा आनंद सावरू शकत नाही. टाळ्यांचा कडकडाट झाला.

शिव ठाकरेंचा चाहता वर्गही काही कमी नाही त्यामुळे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल करत आहेत आणि त्याचे चाहते आशा करत आहेत की पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती व्हावी. शिव ठाकरे बिग बॉस 16 चा विजेता झाल्यावर असचं काहीसं वातावरण पाहायला मिळेल. शिव ठाकरे यांना विजयी करण्यासाठी चाहते वेडे होत असून भरभरून वोटिंग करण्याचे आवाहनही करत आहेत. सध्या शिव ठाकरे ही ट्विटर वर ट्रेंण्ड होत आहे.