Bigg Boss 16 : यंदा चारच बेडरूम अन् मौत का कुआं; रंजक माहिती समोर

गेम बदलेल कारण बिग बॉस स्वतः खेळणार आहे
Bigg Boss 16 News
Bigg Boss 16 NewsBigg Boss 16 News

Bigg Boss 16 News बिग बॉस दोन दिवसांनी सुरू होणार आहे. बिग बॉस सुरू होण्याआधी शो शी संबंधित तपशील समोर येत आहेत. बिग बॉसच्या घरात दरवर्षी क्रिएटिव्ह आणि अनोखी थीम पाहायला मिळतात. हा ट्रेंड यावेळीही पाळला जाईल. बिग बॉसच्या घरात काय घडणार आहे याविषयी एक रंजक माहिती समोर आली आहे.

बिग बॉसची थीम सर्कसची आहे. ‘गेम बदलेल कारण बिग बॉस (Bigg Boss) स्वतः खेळणार आहे’ अशी शोची टॅगलाइन आहे. बिग बॉसचे घर कसे असेल हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे. सर्कसच्या थीमशी मेळ साधत घराची अंतर्गत रचना करण्यात आली आहे. शोच्या इतिहासात यापूर्वी कधीही न घडलेली सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे १६ नाही तर फक्त चार बेडरूम राहणार आहेत.

Bigg Boss 16 News
OTT Platform : सलमान खानने ओटीटीवर काम करू नये; असं का म्हणाला वरुण धवन

सलमान खानच्या (Salman Khan) शोमध्ये आतापर्यंत बेडरूममध्ये बेडसाठी स्पर्धकांमध्ये भांडण होत होते. आता चार बेडरूममध्ये बेडसाठी किती भांडण होईल. मागच्या शोमध्ये डबल बेड आणि सिंगल बेडवर झोपण्यावरून मारामारी झाली होती. अशा परिस्थितीत एकत्र बेड शेअर करणे किती मोठा मुद्दा बनतो हे शो सुरू झाल्यावरच कळेल. सर्वांत मोठा ट्विस्ट बेडरूममध्येच पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रत्येक खोलीची थीम वेगळी

ओमंग कुमार आणि वनिता कुमार यांनी घराची रचना केली आहे. फायर रूम, ब्लॅक अँड व्हाईट रूम, कार्ड्स रूम आणि विंटेज रूम असे चार बेडरूम बांधण्यात आले आहेत. प्रत्येक खोलीची थीम वेगळी आहे. या सर्व रूमशी संबंधित एक मोठा ट्विस्ट असेल. जो कोणता स्पर्धक कोणत्या खोलीत राहणार हे ठरवेल.

Bigg Boss 16 News
Singh is King : मिका सिंगने खरेदी केले बेट; पहिला भारतीय गायक

थ्रिल जास्त

एक विशेष जागा तयार केली गेली आहे. त्याला ‘मौत का कुआं’ हे नाव देण्यात आले आहे. येथे स्टंट, शिक्षेचे टास्क किंवा लक्झरी बजेट टास्क केले जातील. तसेच स्वतंत्र कॅप्टन रूम बनवण्यात आल्या आहे. जो अगदी राजेशाही असेल. तेथे सर्व लक्झरी सुविधा असतील. अनेक नवीन घटक जोडले गेले आहेत. यावेळी बिग बॉसचे घर खूपच रंगतदार आणि चमकदार असणार आहे. शोमध्ये थ्रिलचा डोस कितीतरी पटीने जास्त असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com