Singh is King : मिका सिंगने खरेदी केले बेट; पहिला भारतीय गायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mika Singh Latest News

Singh is King : मिका सिंगने खरेदी केले बेट; पहिला भारतीय गायक

Mika Singh Latest News बॉलिवूड आणि पंजाबी गायक मिका सिंग (Mika Singh) केवळ गाण्यांमुळेच आज या स्थानावर पोहोचू शकला आहे. इंडस्ट्रीत त्याचे अनेक चाहते आहेत. अलीकडेच मिका सिंग ‘स्वयंवर: मिका दी वोहती’मध्ये आकांक्षा पुरी हिची लग्नासाठी निवड केल्यामुळे चर्चेत आला होता. आता मिका खासगी बेट विकत घेतल्याने चर्चेत आहे. मिका सिंग सध्या खाजगी बेटावर वेळ घालवत आहे.

मिका सिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो बोट चालवताना दिसत आहे. त्याचे अंगरक्षक किनाऱ्यावर उभे आहेत. बोटीवर MS म्हणजे मिका सिंग असे लिहिले आहे. मिका सिंग (Mika Singh) मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. मिका सिंग हा पहिला भारतीय गायक आहे ज्याने स्वतःचे खाजगी बेट विकत घेतले आहे.

मिका सिंगने ७ बोटी आणि १० घोडे देखील खरेदी केले आहेत. मिका सिंग हा आलिशान घरे आणि वाहनांचा मालक आहे. मिकाला खासगी बेटावर अशा प्रकारे पाहून चाहते खूप खूश आहेत. एकाने लिहिले, ‘मिका पाजी, सिंग इज किंगचे आयुष्य जगणारे तुम्हीच आहात’. दुसऱ्याने ‘सर, आणखी काही व्हिडिओ शेअर करा’ असे लिहिले आहे.

मिका सिंग हा भारतीय पॉप गायक (Singer) आणि रॅपर आहे. अनेक बंगाली चित्रपटांनाही त्याने आवाज दिला आहे. मिका सिंग पंजाबी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक आहे. त्याने सिंग इज किंग आणि जब वी मेटसह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. या चित्रपटातील गाणी खूप लोकप्रिय झाली.

हेही वाचा: Hina Khan : हिना खान झाली जलपरी; स्वीमिंग पूलच्या आत फोटोशूट

मिका कीर्तनात गायचा

मिका सिंगने फिल्मी करिअरची सुरुवात प्यार के साइड इफेक्ट्स या चित्रपटातून केली होती. मिका अनेक टीव्ही शोमध्ये जज म्हणून दिसला आहे. मिकाने वयाच्या आठव्या वर्षीच गाणे शिकायला सुरुवात केली. वयाच्या १२व्या वर्षी तबला आणि हार्मोनियम वाजवायला सुरुवात केली. मिकाने वयाच्या १४ व्या वर्षी गिटार वाजवायला सुरुवात केली. मिका चित्रपटांमध्ये गाण्याआधी कीर्तनात गायचा.

टॅग्स :singerMika Singh