
Bigg Boss 16: साजिद खानच्या चित्रपटात सौंदर्या शर्मा दाखवणार तिचे सौंदर्य
टीव्ही रिअॅलिटी शो 'बिग बॉस सीझन 16' ची स्पर्धक सौंदर्या शर्मा सध्या खूप चर्चेत आहे. तिच्या सौंदर्य आणि ग्लॅमरमुळे सौंदर्याच्या हातात एक मोठा प्रोजेक्ट आला आहे. बिग बॉसच्या घरात आपल्या हॉट लूकमुळे प्रसिद्धीझोतात आलेली सौंदर्या लवकरच एका आयटम साँगमध्ये तिच्या सौंदर्याची झलक दाखवू शकते. सौंदर्या तिचा बिग बॉस सह-स्पर्धक साजिद खानच्या आगामी चित्रपटाचा एक भाग बनणार असल्याच्या बातम्या आहेत.
सौंदर्या शर्माने भलेही बिग बॉस जिंकले नसले तरी तिने तिच्या चाहत्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावरही ही अभिनेत्री खूप लोकप्रिय आहे. सलमान खानने होस्ट केलेल्या शोमध्ये सौंदर्या तिच्या अप्रतिम व्यक्तिमत्त्वामुळे खूप लोकप्रिय झाली आहे. शो सोडल्यानंतर सौंदर्याला काही मनोरंजक प्रोजेक्ट मिळाले आहेत. वृत्तानुसार, साजिद खानच्या आगामी चित्रपटातील एका आयटम साँगसाठी सौंदर्याला अप्रोच करण्यात आले आहे.
सौंदर्याला साजिद खानच्या पुढच्या चित्रपटात आयटम साँगची ऑफर मिळाली आहे. साजिद खान तब्बल ४ वर्षांनी चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. या चित्रपटात बिग बॉस 13 फेम शहनाज गिल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याच गाण्यासाठी साजिदने सौंदर्याशी संपर्क साधला असून, तिने या गाण्यासाठी सहमती दर्शवल्यास ती लवकरच त्याचे शूटिंग सुरू करू शकते.
बिग बॉसच्या घरात सौंदर्या आणि साजिदची घट्ट मैत्री होती. दोघांची चांगली बाँडिंग आहे. साजिद खानही अनेकवेळा शोमध्ये सौंदर्यासोबत काम करण्याबाबत बोलताना दिसला होता. आता असे दिसते आहे की त्याने आपल्या पुढच्या चित्रपटातील गाण्यासाठी तिला फायनल करून आपले वचन पूर्ण केले आहे.