varun dhawan
varun dhawan Esakal

Varun Dhawan: 'पाळणा कधी हलणार..', त्या प्रश्नावर वरुण म्हणाला, 'आजच..'

Published on

अभिनेता वरुण धवन त्याच्या 'सिटाडेल' या वेब सीरिजमुळं चर्चेत आहे. या सिरिजची शूटिंगही सुरू झाली असून वेब सीरिजमधील अभिनेता वरुण धवनचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे. वरुण नुकताच एका कार्यक्रमात आलिया भट्टसोबत दिसला. यावेळी पापराझींनी त्याला एक प्रश्न विचारला आणि त्यानंतर वरुणच्या उत्तरानं आता एकच चर्चा रंगली आहे.

varun dhawan
Pathaan Box Office Collection Day 7: 'पठाण' ची घोडदौड सातव्या दिवशी मंदावली! मात्र तरीही कमावला इतक्या कोटींचा गल्ला...

याविषयी पापाराझींनी वरुणला त्याच्या कुटुंब नियोजनाबाबत प्रश्न विचारला. यावर वरुण धवनने मजेशीर उत्तर दिले. पापाराझींनी वरुणला विचारले की, 'तो फॅमिली प्लॅनिंग केव्हा करत आहे'. यावर वरुणने सांगितले की, "आलिया आई झाली तु बाबा झालास तर काय सगळ्यांनीच... मी माझ्या बायकोला विचारतो. तिला सांगतो की त्यांनी तसं सांगितलं आहे".

हे ऐकून तिथे उपस्थित सर्व लोक हसू लागले. याशिवाय या कार्यक्रमात आलियाने तिच्या करिअरबद्दल आणि मुलीबद्दलही मोकळ्या गप्पा मारल्या.

varun dhawan
Malaika Arora copy Urfi: उर्फीचे कपडे भाड्याने घेतले की काय? मलायका ड्रेस पाहुन नेटकरी सुसाट

वरूण आणि नताशानं 24 जानेवारी 2021 रोजी लग्न केलं. वरुण आणि नताशानं गेल्यावर्षी अलिबागमध्ये कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केलं होतं. मनोरंजन विश्वात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी चाहत्यांना गूड न्यूज देत आहेत. आलिया-रणबीर, देबिना-गुरमीत आणि बिपाशा-करण यांच्या घरी परीचं स्वागत करण्यात आलं आहे. अशातच अणि नताशा यांच्या घरी पाळणा हलणार अशी चर्चा रंगली होती. मात्र वरुण आणि नताशाने या सर्व अफवा असल्याचं सांगितलं होतं. मात्र वरुणचे चाहते ही गूडन्यूज ऐकण्यासाठी उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com