Bigg Boss 16: सुंबुलनंतर 'या' स्पर्धकाला घरातुन हाकललं? मध्यरात्री असं काय झालं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss 16

Bigg Boss 16: सुंबुलनंतर 'या' स्पर्धकाला घरातुन हाकललं? मध्यरात्री असं काय झालं?

Nimrit Kaur Ahluwalia Eliminated: 'बिग बॉस 16' आता अंतिम टप्यात आला आहे. फिनालेला एक आठवडाही शिल्लक नाही आणि त्यातच घरात एक ट्विट् पहायला मिळणार आहे. बिग बॉसच्या घरात मिड नाइट इविक्शन आल्याचे वृत्त आहे, ज्यामध्ये दावा करण्यात येत आहे की निमृत कौर अहलुवालिया बेघर झाली आहे.

अलीकडेच प्रेक्षकांच्या कमी मतांमुळे सुंबुल तौकीर खान ही घराबाहेर पडली आहे. सुंबुलला बाहेर काढल्यानंतर 'बिग बॉस 16' मध्ये 6 स्पर्धक शिल्लक होते. पण आता निमृतच्या एलिमिनेशननंतर या सीझनला टॉप-5 स्पर्धक मिळाले आहेत.

निमृत कौर अहलुवालिया या शोमधून बाहेर पडली आहे की नाही या बातमीला अद्याप अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाही. पण 'द खबरी' आणि 'बिग बॉस तक'चा यांच्या दाव्यावर विश्वास ठेवला तर निमृतला मध्यरात्री बेदखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

या सीझनमधील टॉप-5 स्पर्धकांची निवड करण्यासाठी बिग बॉसच्या घरात बाहेरून सामान्य लोकांना बोलावण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्यांनी घरात जाऊन लाइव्ह वोटिंग भाग घेतला. जनतेने त्यांच्या आवडीच्या स्पर्धकांना त्यांच्या कामगिरी आणि योगदानाच्या आधारावर वोटिंग केली आहे. ही मतदान प्रक्रिया 6 फेब्रुवारी रोजी येणाऱ्या एपिसोडमध्ये दाखवली जाईल.

या वोटिंग नंतर रात्री उशिरा बिग बॉसने सर्व 6 स्पर्धकांना एका खोलीत बोलावले आणि त्यानंतर टॉप-5 स्पर्धकांची नावे उघड केली. . ज्या स्पर्धकाला सर्वात कमी मते मिळाल्यामुळं निमृत कौर अहलुवालिया बोहेर गेली तर शिव ठाकरे, प्रियंका चहर चौधरी, एमसी स्टॅन, शालीन भानोत, अर्चना गौतम हे टॉप 5 स्पर्धक आता घरात राहणार आहे. 'बिग बॉस 16' चा फिनाले 12 फेब्रुवारीला होणार आहे.