Bigg Boss 16 Winner: शिवचं स्वप्न भंगणार? बिग बॉस 16 चा विजेता होणार 'हा' स्पर्धक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss 16 Winner

Bigg Boss 16 Winner: शिवचं स्वप्न भंगणार? बिग बॉस 16 चा विजेता होणार 'हा' स्पर्धक

बिग बॉस 16 या शोने प्रेक्षकांच भरभरुन मनोरंजन केलं. या शोमध्ये वाद, राडे त्याचबरोबर मैत्री आणि काही महत्वाची नातीही आपण पाहिली. बिग बॉस 16 चा ग्रँड फिनाले 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. त्यामुळे 4 महिन्यांनंतरचा प्रतीक्षेचा क्षण संपेल आणि बिग बॉसचा विजेता कोण? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच पडलं आहे. सध्या बिग बॉस 16 चा विजेता कोण असणार याबद्दल बातम्या येत आहेत.

बिग बॉस शो शी संबधीत बातमी देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या खबरीने याविषयी प्रेडिंक्शन केलं आहे. द खबरीने ट्विटर हँडलवरून भाकित केले आहे की टीव्हीची संस्कारी बहू पुन्हा एकदा बिग बॉसची ट्रॉफी जिंकेल. बिग बॉस 16 ची विजेती प्रियांका चौधरी असणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रिपोर्ट्सनुसार, शिव ठाकरे यांचे बिग बॉस 16 जिंकण्याचे स्वप्न तुटेल. तो फर्स्ट रनर अप बनू शकतो. मीडिया रिपोर्ट्सच्या सर्व अंदाजांचा दावा आहे की फर्स्ट रनर-अप शिव ठाकरे सेकंड रनर-अप एमसी स्टॅन बनू शकतात. दुसरीकडे अर्चना चौथ्या क्रमांकावर आणि शालीन-निमृत शेवटच्या क्रमांकावर असू शकतात.

सध्या बिग बॉस 16 ची ट्रॉफी कोण जिंकते हे सांगणे फार कठीण आहे. शिव ठाकरे आणि प्रियंका यांच्यात सध्या चुरशीची लढत सुरू आहे. चाहते दोघांनाही जोरदार पाठिंबा देत आहेत. सध्या याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या सिझनचा विजेता कोण असणार हे 12 फेब्रुवारीलाच स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.