Bigg Boss 16: वेळेपूर्वीच उघड झाली टॉप 3 स्पर्धकांची नावं; स्पर्धकानेच केला खुलासा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss 16

Bigg Boss 16: वेळेपूर्वीच उघड झाली टॉप 3 स्पर्धकांची नावं; स्पर्धकानेच केला खुलासा..

सलमान खानचा प्रसिद्ध वादग्रस्त शो 'बिग बॉस 16' सध्या चांगलाच धुमाकूळ घालत आहे. आता हा शो शेवटच्या टप्यात आला असून फायनलिस्ट कोण असेल हे जाणून घेण्याची प्रतिक्षा आता चाहत्यांना लागली आहे. नुकतचं अब्दु साजिद आणि श्रीजीता घराबोहेर पडले तर या आठवड्यात सौंदर्या शर्माला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आले आहे.

हेही वाचा: Pathaan Controversy: आसामच्या मुख्यमंत्र्याना किंग खानचा मध्यरात्री फोन म्हणाला,..

आता फक्त ८ स्पर्धकांना ट्रॉफीचे दावेदार आहेत. रिपोर्ट्सनुसार, या सीझनचा फिनाले 12 फेब्रुवारीपर्यंत होऊ शकतो, अशा परिस्थितीत आता लोकांना हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे की या 8 स्पर्धकांपैकी टॉप 3 मध्ये कोणाचा समावेश होणार आहे?

अलीकडे घरातुन बाहेर पडलेली . या व्हिडिओमध्ये श्रीजीता सांगतेय की बिग बॉस 16 च्या फिनालेमध्ये स्पर्धक श्रीजीता डे हिचा एक व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे कोणते टॉप 3 स्पर्धक कोण पोहचतील.

हेही वाचा: Selfiee Trailer: गोष्ट फक्त एका 'सेल्फी'ची! सुपरस्टार अन् सुपरफॅन मधला राडा..

व्हिडिओमध्ये श्रीजीता डे सांगत आहेत, "मला वाटते की शालीन भानोत, प्रियंका चौधरी आणि शिव ठाकरे हे टॉप 3 मध्ये असावेत." श्रीजीता डे यांचा हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत आणि प्रतिक्रियाही येत आहेत.

हेही वाचा: Vivek Agnihotri: काश्मीर फाईल्सच्या अग्नीहोत्रींचा राहुल गांधींना टोला, 'मी तर हवेतच'

आता घरात शालीन भानोत, टीना दत्ता, एमसी स्टेन, शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, सुंबुल तौकीर खान, अर्चना गौतम आणि निमृत कौर हे स्पर्धक आहेत. आता या 8 स्पर्धकांमध्ये तिकीट टू फिनालेची लढाई सुरू आहे.