Bigg Boss 16 Promo: बिग बॉसचा प्रोमो व्हायरल! भाईजान झाला 'गब्बर सिंग' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss 16 Promo

Bigg Boss 16 Promo: बिग बॉसचा प्रोमो व्हायरल! भाईजान झाला 'गब्बर सिंग'

Bigg Boss 16 new promo: टीव्ही मनोरंजन विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय असणारा रियॅलिटी शो बिग बॉसचा प्रोमो आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉसचा 16 वा सीझन लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. अशावेळी सोशल मीडियावरुन त्याचे मोठ्या प्रमाणात प्रमोशन होत असल्याचे दिसून आले आहे. बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा गेल्या कित्येक सीझनपासून होस्टिंगची जबाबदारी पार पाडताना दिसत आहे. एक ऑक्टोबरपासून बिग बॉसला सुरुवात होणार आहे.

मेकर्सनं बिग बॉसच्या प्रोमोचा व्हिडिओ शेयर केला आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. भाईजान चक्क गब्बरच्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर आला आहे. सलमान हा गब्बरच्या भूमिकेत असून तो सगळ्या स्पर्धकांना येणाऱ्या स्पर्धेसाठी सावध करताना दिसतो आहे. यावेळी आपण निर्णायक भूमिका घेणार असल्याचे त्याचे म्हणणे आहे. सलमानचा तो आवेश भलताच आक्रमक आहे. त्यामुळे यंदाचा सीझन हा देखील लक्षवेधी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

लेदर बुटस, हातात बंदूक घेऊन, ब्लॅक जीन्स, ग्रीन डेनिम लूक यामुळे सलमान आणखीनच प्रभावी दिसत आहे. सलमानच्या त्या लूकवर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. आगामी बिग बॉसच्या नव्या सीझनचे प्रेक्षकांना वेध लागले आहेत. तो व्हिडिओ शेयर करताना सलमान म्हणतो, दूर दूर पसरलेल्या भागात जेव्हा कुणी एखादा लहान मुलगा रडेल तेव्हा त्याला त्याची आई सांगेल की, झोपून जा नाहीतर बिग बॉस येईल....

हेही वाचा: Ira-Nupur Shikhare: आमिरची लेक होणार पुण्याची सून! जावईबापू पुण्याचा 'जीमकरी'

आता तुम्हाला गब्बर देखील जवळचा वाटू लागेल. जेव्हा बिग बॉसचा खेळ तुमच्यासमोर येईल... अशी कॅप्शन मेकर्सनं सोशल मीडियावर दिली आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: Rakhi Sawant : लग्नाच्या दिवशीच आई व्हायचं; आलियाचे नाव घेत राखीने व्यक्त केली इच्छा

Web Title: Bigg Boss 16 Promo Viral Salman Khan Gabbar Look Social Media Colors Tv

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..