Bigg Boss 16: Salman Khan thrashes Shalin Bhanot for his 'bloody irritating' obsession with chicken | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss 16: Salman Khan thrashes Shalin Bhanot for his 'bloody irritating' obsession with chicken

Bigg Boss 16: तुझ्या चिकन प्रकरणाचा प्रेक्षकांना किळस आलाय, शालीन भनोतलची काढली..

bigg boss 16: सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' हिंदी सतत चर्चेत असतो. प्रत्येक एपिसोडमध्ये स्पर्धकांमध्ये प्रचंड वाद आणि अटीतटीची स्पर्धा पाहायला मिळते आहे. सध्या बिग बॉसच्या घरात बरेच काही घडत आहे. पण आज काहीतरी वेगळंच पहायला मिळणार आहे. बिग बॉसचा प्रोमो मध्ये शालीन बिग बॉसच्या घरात चिकनसाठी चिंतेत दिसत आहे. त्याच्या या वागण्याला बिग बॉसने त्याला फटकारले होते आणि आता सलमानने त्याची चांगलीच शाळा घेतली.

बिग बॉस 16 हा सध्या अधिकाधिक मनोरंजक होत आहे. या सीझनसाठी बिग बॉस वीकेंड का वारमध्ये सलमान खान सगळ्यांची शाळा घेतो पण या वेळी शालीन भनोतच्या सारख्या चिकन मागण्यावर त्याची चांगलीच जिरवली आहे.

हेही वाचा: Bhagyashree: पतीवरील गंभीर शस्त्रक्रियेनंतर अभिनेत्री भाग्यश्रीची पोस्ट, म्हणाली..

कलर्स चॅनलने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या प्रोमो व्हिडिओमध्ये दाखविले आहे. सलमान शालिनला म्हणतो "शालीन ते सारखं चिकन चिकन मागणं पाहून आता वैताग येतो आहे, झोपेच्या आधी चिकन.. उठल्यावर चिकन.. काय आहे हे, तुला आरोग्यासाठी चिकन गरजेचे आहे आणि बिग बॉस चिकन देत आहेत, तरी तुला कमी पडत आहे? आता बिग बॉसला सांगणार आहे हे चिकन देण बंद करा, तुझ्या या सारखं चिकन मागण्याची बाहेर थट्टा उडवली जात आहे. शालिन बिग बॉस मध्ये चिकन खायला आला आहे असा लोकांचा समज झाला आहे.

सलमान प्रियंकाला या चिकन प्रकरणाबदद्ल तिचं मत विचारतो. त्यावर प्रियंका बोलते "शालिनच्या वाट्याचं चिकन त्याला भेटतं तरी तो अजुन मागतो आम्ही पण आता वैतागलो आहोत. शेवटी सलमान शालिनला बोलतो, "तुझे लक्ष ट्रॉफीवर असले पाहिजे, चिकनवर नाही"

टॅग्स :Big Bossbigg boss