Bigg Boss 16: 'हे मराठी बिग बॉस आहे का?' अर्चनानं पुन्हा डिवचलं..शिव ठाकरेचं सडेतोड उत्तर वाचाच एकदा Shiv Thakare | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss 16 Shiv Thakare and Archana Gautam ugly fight

Bigg Boss 16: 'हे मराठी बिग बॉस आहे का?' अर्चनानं पुन्हा डिवचलं..शिव ठाकरेचं सडेतोड उत्तर वाचाच एकदा

Bigg Boss 16: अर्चना गौतम आणि शिव ठाकरे यांच्यात पुन्हा मोठी बाचाबाची झाली ज्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

नवीन दिवस, नवीन आश्चर्य! विजेत्याच्या बक्षीस रकमेतील 10 लाख ही एकमेव कमाई म्हणून घोषित केल्यानंतर बिग बॉसच्या संपूर्ण घराला मोठा फटका सहन करावा लागला. राशन खरेदी करताना याचा मोठा परिणाम झालेला दिसून आला.

सर्व वस्तूंची किंमत जास्त असल्याने, फक्त एक स्पर्धक होता ज्याने राशन भरण्यापूर्वी इतरांचा सल्ला घेतला तो म्हणजे शिव ठाकरे.(Bigg Boss 16 Shiv Thakare and Archana Gautam ugly fight)

हेही वाचा: Minissha Lamba: 'मला कतरिनासोबत रोमान्स करायला आवडेल..',

सर्व स्पर्धकांना त्यांच्या ट्रॉली घेण्यास सांगण्यात आले आणि बजर वाजताच, सर्व स्पर्धकांना शर्यत करण्यास आणि अंतिम रेषेपर्यंत पोहोचण्यास सांगितले गेले, जो प्रथम प्रवेश करतो तो रेशन आणण्यासाठी ठेवलेल्या भागात जातो.

निमृत संचालक होती, आणि कार्याचा निर्णायक घटक होती. शालिन त्याच्या वाट्याचे राशन आणायला आत गेला. शिव हा या क्षेत्रात प्रवेश करणारा पुढचा स्पर्धक होता आणि त्याने निमृत आणि इतर स्पर्धकांचा सल्ला घेतला.त्याने कॉफी विकत घेतली जे अर्चनाला पटले नाही, जिने 'हे ​​मराठी बिग बॉस आहे का?' असे म्हणत शिवची चेष्टा करायला सुरुवात केली.

हेही वाचा: Bigg Boss 16: शालिन आणि टीनानं एकमेकांची इज्जतच काढली; थेट चारित्र्यावर...

त्यानंतर शिवने अर्चनाला स्वतःच्या औषधाची चव दिली आणि फक्त इतरांना शिव्याशाप दिल्याबद्दल आणि कार्य योग्यरित्या न केल्याबद्दल तिला फटकारले. यावर शालिन आणि निमृत यांनीही शिवची बाजू घेतली.

शालिन भानोत यांनी तर "जो कोणी म्हणेल त्याकडे लक्ष देऊ नको, आम्हाला माहित आहे की तु नेहमीच तुझं राशन सगळयाना देत आलास आणि ते कधीही स्वतःकडे ठेवले नाही" अस म्हणत शिवचे गुणगान गायले आणि फक्त या दोघांनीच नाही तर अर्चनाची मैत्रिण सौंदर्याने देखील तिला तिची चूक दाखवली ज्यामुळे अर्चना आणखीनच चिडली!

आता अर्चनानं मराठी बिग बॉस आहे का असं शिवला डिवचत स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली आहे. या नंतर शिवचं पारडं नक्कीच जड झालेलं पहायला मिळणार यात शंकाच नाही.