Bigg Boss 16: गौतम गुलाटीने केला गोप्यस्फोट, फिनालेपूर्वीच सांगितले विजेत्याचे नाव

'बिग बॉस 8' चा विजेता गौतम गुलाटीने सीझन 16 च्या विजेत्याची ट्रॉफी कोणाकडे जावी हे सांगितले.
Gautam Gulati
Gautam Gulati Sakal

'बिग बॉस 16' चा फीवर आता आणखी वाढू लागला आहे. जसजसा फिनाले जवळ येत आहे तसतशी प्रेक्षकांमध्ये या शोची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत विजयासाठी स्पर्धकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. सर्वांच्या नजरा आता विजेत्यावर खिळल्या आहेत.

'बिग बॉस 16' मध्ये 5 स्पर्धक टॉप 5 मध्ये पोहोचले आहेत. अशा स्थितीत आता प्रियंका चहर चौधरी, शिव ठाकरे, एमसी स्टेन, अर्चना गौतम आणि शालीन भानोत कोणाच्या डोक्यावर विजेतेपदाचा मुकुट सजवणार हे पाहावे लागेल.

'बिग बॉस 16' चा ग्रँड फिनाले सध्या मनोरंजनाच्या बातम्यांमध्ये चर्चेत आहे. सलमान खानच्या या शोच्या फिनालेला फक्त ४ दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत 'बिग बॉस 8' चा विजेता गौतम गुलाटीने सीझन 16 च्या विजेत्याची ट्रॉफी कोणाकडे जावी हे सांगितले. ती दुसरी कोणी नसून 'बिग बॉस 16' ची सर्वात सुंदर प्रियांका चाहर चौधरी आहे.

गौतम गुलाटीने प्रियांकाच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. 'बिग बॉस 16' एपिसोड झाल्यानंतर काही तासांनंतर, गौतमने ट्विट केले, "प्रियांका को ट्रॉफी और स्टेन के गाणे पे रील तो बनती है बॉस #bb16...". गौतमचे हे ट्विट सध्या ट्विटरवर चांगलेच व्हायरल होत आहे. यावर कमेंट करत चाहतेही आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

Gautam Gulati
Shah Rukh Khan: किंग खानची खास पोस्ट; चाहत्यांचे आभार मानत म्हणाला...

'बिग बॉस 16' च्या फिनालेपूर्वीच प्रत्येक स्पर्धकाचा प्रवास दाखवला जाईल. हा प्रवास प्रेक्षकांना आगामी भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. आतापासून, शालीन भानोत, अर्चना गौतम, प्रियांका चहर चौधरी, शिव ठाकरे आणि एमसी स्टॅनचा प्रवास 'बिग बॉस 16' च्या एपिसोडमध्ये क्लिकच्या स्वरूपात शेअर केला जाईल.

त्याचवेळी प्रियंका चहर चौधरीच्या प्रवासाचा व्हिडीओ काही दिवसांपासून व्हायरल होत आहे, जो प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com