Mc Stan: 'बिग बॉस 16'चा विजेता होताच एमसी स्टॅनचे उजळले नशीब, आता बॉलिवूडमधील सुपरस्टार्ससोबत करणार धमाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MC Stan

Mc Stan: 'बिग बॉस 16'चा विजेता होताच एमसी स्टॅनचे उजळले नशीब, आता बॉलिवूडमधील सुपरस्टार्ससोबत करणार धमाल

रॅपर एमसी स्टॅन 'बिग बॉस 16' चा विजेता बनल्यापासून सर्वत्र त्याची चर्चा होत आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत, त्याने सलमान खानपासून ते 'पठाण' स्टार शाहरुख खान आणि विराट कोहली सारख्या दिग्गज सेलिब्रिटींनाही मागे टाकले आहे. आता स्टॅन बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी सज्ज झाला आहे.

एमसी स्टॅन लवकरच बी-टाऊनमध्ये दाखल होणार असल्याची माहिती आहे. तो बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपला आवाज देणार आहे. आपल्या टॅलेंटमुळे प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या एमसी स्टॅन बद्दलचे हे रिपोर्ट्स संगीतकार साजिद अलीला भेटल्यापासून व्हायरल होत आहेत.

रिपोर्टनुसार, स्टॅनला साजिद-वाजिदच्या म्युझिक कंपनीकडून एक मोठी ऑफर मिळाली आहे. मात्र, त्यावर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही.

एमसी स्टॅन 'बिग बॉस 16' चा विजेता बनणे शॉकिंग होते, परंतु त्याचे चाहते खूप आनंदी आहेत. स्टॅनने खूप लोकप्रियता मिळवली. त्याला केवळ बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमधूनही ऑफर्स येत आहेत. होय, रिपोर्ट्सनुसार, स्टेन अमेरिकन म्युझिक प्रोड्यूसर KSHMR सोबत काही म्युझिक व्हिडिओ करणार आहे. या गाण्याची झलकही त्याने 'बिग बॉस 16'च्या मंचावर शेअर केली होती.

एमसी स्टॅन 8 व्या वर्गात होता तेव्हा त्याने रॅपिंग सुरू केले. पूर्वी तो कव्वाली गात असत. पुण्याचा रहिवासी एमसी स्टॅनला टाऊनशिपचे सेलिब्रिटी म्हटले जाते. 'स्नेक', ‘जेंडर’, ‘इंसान’, 'तडीपार' ही त्याची लोकप्रिय गाणी आहेत.

स्टॅन अनेकवेळा गैरवर्तन केल्यामुळे देखील वादात सापडला होता. मात्र, स्टॅन 'बिग बॉस 16' मध्ये लोकांची मन जिंकण्यासाठी आला आणि त्यात तो यशस्वीही झाला.