Bigg Boss 17: 'टीव्ही कलाकारांना बिग बॉसकडून मिळतो जास्त सपोर्ट', युट्युबरचा मेकर्सवर थेट आरोप, चर्चेला उधाण

अनुरागनं डोभालच्या त्या विधानानंतर बिग बॉसनं युट्युबरचा चांगलाच क्लास घेतला आहे.
Bigg Boss 17 Anurag Dobhal Youtuber Viral
Bigg Boss 17 Anurag Dobhal Youtuber Viralesakal

Bigg Boss 17 Anurag Dobhal Youtuber Viral : टीव्ही मनोरंजन विश्वात ज्या रियॅलिटी शो ची जोरदार चर्चा असते त्या सलमान खानच्या बिग बॉसच्या १७ व्या सीझनला सुरुवात झाली आहे. आठवडाभरानंतर आता त्यातील स्पर्धकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. यंदाच्या सीझनचा शो प्रीमिअरच्या दिवसापासून चर्चेत आला आहे.

विक्की जैन आणि अंकिता लोखंडे यांच्यात वाद सुरु झाला आहे. त्याची चर्चा होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओनं लक्ष वेधून घेतले आहे. बिग बॉस मेकर्सवर आता प्रसिद्ध युट्युबर अनुराग डोभाल यानं मोठे आरोप केले आहेत. तो म्हणतो बिग बॉस हे टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांना जास्त सपोर्ट करते. यानंतर बिग बॉसनं त्याला चांगलेच सुनावले आहे.

Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

बिग बॉसने घेतला क्लास....

अनुरागनं डोभालच्या त्या विधानानंतर बिग बॉसनं युट्युबरचा चांगलाच क्लास घेतला आहे. त्यानं जे विधान केले त्यावरुन त्याला विचारणा देखील केली आहे. बिग बॉसनं अनुरागला म्हटले आहे की, आम्ही तुला आता वेळ देतो. त्यातून तू स्वताला सिद्ध करुन दाखव. सलमानच्या त्या एपिसोडनंतर आता वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. अनुराग म्हणतो की, बिग बॉस हा काही कपल्स शो नाही. तो टीव्हीवाल्यांसाठीचा शो आहे.

बिग बॉस म्हणतात की, आता मला १७ वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे हा शो कसा सुरु ठेवायचा हेही मला माहिती आहे. अनुराग तुला स्वताला चांगले खेळता आले तर खेळ किंवा नाही. अशा शब्दांत बिग बॉसनं त्याला खडसावले आहे. ती चर्चा आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. त्यावर आलेल्या प्रतिक्रिया देखील खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत. अनुराग तू बिग बॉसच्या घरात शिस्तीनं राहण्याची गरज आहे.

बिग बॉसनं अनुरागची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. त्यांनी अनुरागला तलाव खराब करणारा मासा असे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून अनुराग हा बिग बॉसच्या माध्यमातून चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर त्याच्या नावाची वेगळ्या प्रकारे चर्चा सुरु असून त्यावर नेटकऱ्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

Bigg Boss 17 Anurag Dobhal Youtuber Viral
Ganapath Movie Review : टायगरच्या माकडउड्यांचा 'फुसका गणपत', आजारी पडलेली कथा अन् बरचं काही!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com