बिग बॉस फेम आसिम रियाजवर बाईकस्वारांनी केला हल्ला

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 7 August 2020

आसिम रियाजला एका बाईकस्वारांनी टक्कर दिली ज्यामुळे आसिम जखमी झाला आहे. याबाबतची माहिती स्वतः आसिमने सोशल मिडियावर त्याच्या चाहत्यांसाठी दिली आहे. 

मुंबई- बिग बॉस सिझन १३ चा उपविजेता, मॉडेल आणि अभिनेता आसिम रियाजच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. आसिम रियाजला एका बाईकस्वारांनी टक्कर दिली ज्यामुळे आसिम जखमी झाला आहे. याबाबतची माहिती स्वतः आसिमने सोशल मिडियावर त्याच्या चाहत्यांसाठी दिली आहे. 

हे ही वाचा: राष्ट्रीय महिला आयोगाने महेश भट्ट आणि उर्वशी रौतेलाला पाठवली नोटीस, काय आहे प्रकरण?

आसिम रियाजने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. आसिमने सांगितलं तो रस्त्यावर सायकल चालवत होता आणि अचानक एका बाईकस्वाराने जाणूनबुजून त्याला टक्कर मारली. आसिमने व्हिडिओमध्ये दाखवलं की त्याला कशाप्रकारे शरिरावर जखमा झाल्या आहेत. आसिमने व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे गुडघ्यावर आणि पायावर त्याला जखमा झाल्या आहेत. यासोबतंच त्याच्या खांद्यावर आणि पाठीवर देखील मार लागला आहे. मात्र बाईकस्वार हल्लेखोरांना पकडण्यात यश आलं की नाही याबाबत अजुन माहिती मिळू शकलेली नाही.

आसिम रियाज हल्ल्यात जखमी झाल्याचं सोशल मिडियावर कळल्यावर त्याच्यासाठी प्रार्थनांचा ओघ सुरु झाला. ट्विटरवर सतत आसिम रियाजचं नाव ट्रेंड होत आहे. आत्तपर्यंत हजारो लोकांनी आसिमसाठी ट्विट केलं आहे. 

हिमांशी खुरानावर देखील झाला होता हल्ला

आसिम रियाजची कथित गर्लफ्रेंड असलेल्या हिमांशी खुरानावर देखील गेल्या महिन्यात हल्ला झाला होता. हिमांशीने सांगितलं होतं की, तिच्या कारवर हल्ला झाला एवढंच नाही तिच्या गाडीचं टायर देखील पंक्चर केलं होतं.  

bigg boss ex contestant asim riaz injured in accident hit by bike rider  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bigg boss ex contestant asim riaz injured in accident hit by bike rider