esakal | राष्ट्रीय महिला आयोगाने महेश भट्ट आणि उर्वशी रौतेलाला पाठवली नोटीस, काय आहे प्रकरण?
sakal

बोलून बातमी शोधा

urvashi and mahesh bhatt

दिग्दर्शक महेश भट्ट आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला सोबत इतर काही जणांना त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी नोटीस पाठवली आहे. 

राष्ट्रीय महिला आयोगाने महेश भट्ट आणि उर्वशी रौतेलाला पाठवली नोटीस, काय आहे प्रकरण?

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- बॉलीवूडमध्ये एक ना अनेक गोष्टी सध्या घडत आहेत. २०२० हे वर्ष मनोरंजन विश्वासाठी सगळ्या बाजूनेच घातक ठरतंय असंच चित्र आहे. आता दिग्दर्शक महेश भट्ट आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला हिला राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस पाठवत त्यांना जबाब देण्यासाठी बोलवलं आहे. काय आहे हे प्रकरण पुढे वाचा...

हे ही वाचा: रियाच्या कॉल डिटेल्सचा खुलासा, ५ दिवसांत सुशांतला केले होते २५ फोन?

सिनेमांमध्ये करिअर बनवण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुलींना ब्युटी स्पर्धेत सहभागी करण्याच्या नावावर त्यांचं लैंगिक शोषण केल्याचं आणि त्यांना ब्लॅकमेल केल्याचं एक प्रकरण प्रलंबित आहेत. या कारणामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने नुकतंच दिग्दर्शक महेश भट्ट आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला सोबत इतर काही जणांना त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी नोटीस पाठवली आहे. 

त्याचं झालं असं की सामाजिक कार्यकर्त्या योगिता भयाना यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये एका कंपनीच्या प्रमोटर विरोधात आरोप केले आहेत. त्यांनी या आरोपांमध्ये म्हटलं आहे की, त्याने मॉडेलिंगमध्ये करिअर बनवण्यासाठी संधी देतो हा बहाण्याने अनेक मुलींना ब्लॅकमेल केलं आहे आणि त्यांचं लैंगिक शोषणही केलं आहे. अशातंच या प्रकरणात साक्ष देण्यासाठी महेश भट्ट आणि उर्वशी रौतेला यांना नोटीस पाठवली गेली आहे. 

महेश भट्ट यांच्याबाबत सांगायचं झालं तर ते जवळपास २१ वर्षांनी 'सडक २' सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून पुन्हा पडद्यावर येत आहेत. १९९९ साली 'कारतूस' सिनेमा हा त्यांच्या शेवटचा दिग्दर्शित केलेला सिनेमा होता. 'सडक २' हा सिनेमा २८ ऑगस्टला रिलीज होणार आहे. तर अभिनेत्री उर्वशी रौतेला 'वर्जिन भानुप्रिया' या सिनेमात शेवटची दिसून आली होती. हा सिनेमा डिजीटल प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. उर्वशी सोशल मिडियावर जास्त सक्रिय असते.  

ncw notice to mahesh bhatt and urvashi rautela for recordingof statement in sexual abuse case