'बिग बॉस' फेम अभिनेत्याची गर्लफ्रेंड सेक्स रॅकेटमध्ये

वृत्तसंस्था
शनिवार, 11 जानेवारी 2020

अटक करण्यात आलेल्या अभिनेत्रीने फरहान खान याच्यावर अनेक आरोप केले आहेत. यामध्ये तिने फरहान माजी फसवणूक केल्याचे म्हटले आहे. फरहान तिच्याकडून काही पैसेही घेतले होते, ते अजून परत केलेले नाहीत.

मुंबई : टेलिव्हिजन रिऍलिटी शो 'बिग बॉस'मध्ये सहभागी असलेला अभिनेता अरहान खान याची गर्लफ्रेंड सेक्स रॅकेटमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी एका पंचतारांकित हॉटेलमधून अटक केलेल्यांमध्ये या अभिनेत्याच्या गर्लफ्रेंडचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबईतील दिंडोशी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरु असलेले हे सेक्स रॅकेट पोलिसांनी सापळा रचून पकडले आहे. यामध्ये काही अभिनेत्री व मॉडेलचा समावेश आहे. पोलिसांनी गुरुवारी रात्री कारवाई करत यांना अटक केली असून, अटक केेलेल्यांमध्ये दोन अभिनेत्रीचाही समावेश आहे. गोरेगावमधील एका हॉटेलमध्ये हा सर्व प्रकार सुरु होता.

पोलिस भरतीसंदर्भात मोठा निर्णय; आता मैदानी चाचणीनंतर लगेच...

पोलिस अधिकारी धर्मेंद्र कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाली होती. येथून 32 वर्षीय आणि 26 वर्षीय अभिनेत्रींनाअटक करण्यात आली आहे. यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अटक करण्यात आलेल्या अभिनेत्रीने फरहान खान याच्यावर अनेक आरोप केले आहेत. यामध्ये तिने फरहान माजी फसवणूक केल्याचे म्हटले आहे. फरहान तिच्याकडून काही पैसेही घेतले होते, ते अजून परत केलेले नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bigg boss fame Arhaan Khan ex girlfriend Amrita Dhanoa arrested allegedly being in sex racket