esakal | 'बिग बॉस' फेम निक्की तांबोळीच्या २९ वर्षीय भावाचं कोरोनाने निधन

बोलून बातमी शोधा

Nikki Tamboli, Jatin Tamboli
'बिग बॉस' फेम निक्की तांबोळीच्या २९ वर्षीय भावाचं कोरोनाने निधन
sakal_logo
By
स्वाती वेमूल

'बिग बॉस'च्या १४व्या Bigg Boss 14 पर्वाची स्पर्धक निक्की तांबोळीचा Nikki Tamboli भाऊ जतिन तांबोळी Jatin Tamboli याचं कोरोनाने निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती खालावली होती. अखेर मंगळवारी सकाळी त्याने जगाचा निरोप घेतला. जतिन अवघा २९ वर्षांचा होता. भावाच्या निधनानंतर निक्कीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. (Bigg Boss fame Nikki Tambolis brother passes away after battling COVID 19)

'आज सकाळी देव तुझं नाव घेईल, हे आम्हाला ठाऊक नव्हतं. तुझ्या निधनामुळे आम्ही सर्वजण खचलो आहोत. तू फक्त एकटा गेला नाहीस, तर आम्हा सर्वांमधील एक भाग तुझ्यासोबत गेला आहे. तुझ्या सुंदर आठवणी मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवल्या आहेत. जरी आम्ही तुला आता पाहू शकलो नसलो तरी तू नेहमीच आमच्यासोबत असशील हे मला माहित आहे. आता पूर्वीसारखं काहीच राहिलं नाही. तुला अखेरचा निरोपसुद्धा आम्ही देऊ शकलो नाही. आम्हाला काही समजण्याआधीच तू जग सोडून निघून गेलास', अशा शब्दांत निक्कीने तिच्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा : कोरोना रुग्णांसाठी आलियाने पुढे केला मदतीचा हात

निक्कीने आणखी एका पोस्टमध्ये तिच्या भावाच्या तब्येतीविषयीची माहिती दिली होती. 'माझा भाऊ फक्त २९ वर्षांचा होता. गेल्या अनेक वर्षांपासून त्याला आरोग्याच्या काही समस्या जाणवत होत्या. त्याच्या फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाल्याने २० दिवसांपूर्वी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याला कोरोना आणि टीबीची लागण झाली होती. त्यातच न्युमोनियासुद्धा झाला होता. अखेर आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. देवाने माझ्या भावाला आजवर अनेकदा वाचवलं, पण म्हणतात ना, नशिबात जे लिहिलंय तेच शेवटी घडतं', असं तिने लिहिलं.