Prasad-Amruta: बिगबॉस होताच प्रसाद अन् अमृताच डेटिंग सुरु? फोटो व्हायरल.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prasad Jawade And Amruta Deshmukh

Prasad-Amruta: बिगबॉस होताच प्रसाद अन् अमृताच डेटिंग सुरु? फोटो व्हायरल..

Prasad Jawade And Amruta Deshmukh: बिग बॉस मराठीचा चौथा सीजन संपला असला तरी या शोची आणि घरातील सदस्यांची चर्चा काही संपत नाही आहे. प्रत्येकवेळी बिग बॉसच्या घरात वाद, भांडण आरोप याशिवाय लव्ह कनेक्शन होतचं. कुणाच्या ना कुणाच्या रेशीमगाठी येथे जुळतातच. या वेळी बिग बॉसच्या घरात प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख या दोघांमध्ये काहीतरी शिजत होतं हे तर सगळ्यांनाच समजलं.

बिग बॉस मराठी ४ सिझन जरी संपला आहे तरी घरातील सदस्याच बाहेर काय चालु आहे हे त्यांच्या चाहत्यांना जाणून घ्यायचं असतेच. बिग बॉसच्या घरातील लव्ह बर्डस होते ते म्हणजे प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख.

हेही वाचा: Quotation Gang Trailer: असेल हिंमत तर कोटेशन गँगचा ट्रेलर पाहून दाखवा! जॅकी श्रॉफ सनीनं तर...

जरी या दोघांनी त्यांच्या प्रेमाचा स्वीकार नाही केला तरी एकमेकांना घेऊन प्रेमाच्या भावना आहेत हे त्यांच्या वागण्यावरून दिसून येत होतं. इतकेच नव्हे तर प्रसादने तर अमृताला 'पुण्याची बाकरवडी' असे प्रेमळ नाव देखील दिले होतं. अमृता देशमुख घरातुन नॉमिनेट झाल्यावर जास्त वाईट वाटलं ते प्रसादालाच .

हेही वाचा: Aishwarya Rai Net Worth: परदेशातही आहे तिचं 'ऐश्वर्य', संपत्तीचा आकडा ऐकून बसेल धक्का

आता त्याच्या या दोघांत नक्कीच काही तरी शिजत आहे. त्याची चर्चा सुरु झाली ती प्रसादच्या पोस्ट नंतर. प्रसाद जावादेने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.त्यामध्ये प्रसादाने हातात मोबाईल घेतला आहे आणि मोबाईलमध्ये बघुन इतकी गोड स्माईल दिली आहे जणू त्याच्या गालावरची खळी फुलली आहे. आणि ' तुमच्या क्लिकसाठी सुधारित मॉडेल ' असं कॅप्शन दिलं देत अमृताला टॅग केलयं.

हेही वाचा: Rakhi Sawant: राखीचा नवरा सलमानला घाबरला म्हणुन...आदिल खानबद्दल मोठा खुलासा

मात्र यानंतर त्याच्या चाहत्यामध्ये चर्चा रंगली आहे. दोघांच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे की या दोघांमध्ये नक्की काय चालु आहे हे जाणुन घेण्यासाठी उत्सुक आहेत. काहींनी तर कमेंट करत सरळ प्रसादलाच विचारल की तु अमृता डेटवर आहेस का? अद्याप दोघांनीही त्याच्या नात्याबद्दल काहीही माहीती दिलेली नाही. मात्र या दोघांची जोडी चाहत्यांची आवडती जोडी आहे यात काही वाद नाही.

टॅग्स :Actortv actress