बिग बॉसने स्पर्धकांना रडवलं!

वृत्तसंस्था
Friday, 30 August 2019

बिग बॉस मराठीचं दुसरं पर्व लवकरच संपणार आहे. पर्वाच्या अंतिम टप्प्यात नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, आरोह वेलणकर, किशोरी शहाणे, शिव ठाकरे आणि वीणा जगताप हे सहा स्पर्धक पोहोचले आहेत. त्यांना आजवरच्या प्रवासाचा व्हिडीओ दाखविण्यात आला.

मुंबई : बिग बॉस मराठीचं दुसरं पर्व लवकरच संपणार आहे. पर्वाच्या अंतिम टप्प्यात नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, आरोह वेलणकर, किशोरी शहाणे, शिव ठाकरे आणि वीणा जगताप हे सहा स्पर्धक पोहोचले आहेत. या सहा स्पर्धकांनी आपल्या उस्फुर्त खेळीने लोकांची मने जिंकली आहेत. त्यामुळे आता हे पर्व कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वत्र पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर अंतिम टप्प्यात गेलेल्या स्पर्धकांना बिग बॉसकडून एक आठवणींची भेट मिळाली आहे. कालच्या एपिसोडमध्ये या स्पर्धकांना त्यांच्या आजवरच्या प्रवासाचा एक व्हिीडीओ दाखविण्यात आला. 

आजवरचा बिग बॉसच्या घरातला आपला प्रवास आणि चांगले- वाईट अनुभव या व्हिडीओमध्ये पाहून सदस्यांना अश्रु अनावर झाले. सर्वात आधी शिवला गार्डन एरियामध्ये बोलावण्यात आले आणि मोठ्या पडद्यावर त्याच्या घरातल्या सर्वात चांगल्या क्षणांचा व्हिडीओ दाखविण्य़ात आला. त्याच्यासाठी बिग बॉसच्या घरातला अनुभव हा एका स्वप्नासारखाच होता. त्याची वीणासोबत असलेली मैत्री हे सर्व पाहून तो भावूक झाला. त्यानंतर किशोरी आणि नेहा यांना देखील ही अनोखी भेट देण्यात आली. किशोरी वयामध्ये सर्वांमध्ये मोठी असुनही तिने आजवर ज्यापद्धतीने हा शो खेळला आणि सर्वांना सांभांळून घेतले याचं बिग बॉसकडून कौतुक करण्यात आलं. आरोह वाईल्ट कार्ड एंट्रिमधूनही आपल्या उत्तम खेळीने अंतिम ट्प्प्यात पोहोचला आहे. तर, शिवानीनेही सर्व अडचणींवर मात करत पुन्हा घरात स्थान मिळवलं. नेहा आणि वीणा या दोघी स्ट्रॉंग सदस्य असूनही मात्र त्यांचा प्रवास पाहताना दोघीही अत्यंत भावूक झाल्या.

बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या या पर्वाचा विजेता कोण असेल याची वाट प्रेक्षक आतुरतेने पाहत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bigg Boss Marathi 2 Finalists get the best surprise ahead of finale