BBM3: मीरा आणि सोनालीमध्ये 'राडा'...| Bigg Boss Marathi 3 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

meera jagannath and sonali patil
BBM3: मीरा आणि सोनालीमध्ये 'राडा'...

BBM3: मीरा आणि सोनालीमध्ये 'राडा'...

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस मराठी’ हा शो लोकप्रिय शो पैकी एक आहे. सध्या ‘बिग बॉस मराठी’चे ३ पर्व सुरु आहे. ‘बिग बॉस मराठी’ सुरु झाल्यापासून प्रेक्षकांना सतत स्पर्धकांमध्ये वाद पाहायला मिळाले आहेत.दुसरीकडे स्पर्धकांचा वावर आणि त्यांची धमाल मस्ती चाहत्यांना चांगलीच आवडत आहे. बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांना प्रत्येक आठवड्यात एक वेगळा टास्क पाहायला मिळतो. या आठवड्यातील टास्कमध्ये, स्पर्धक मीरा आणि सोनालीमध्ये हाणामारी झाल्याचं दिसत आहे.

कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शोचा प्रोमो पोस्ट करण्यात आला आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये आज टास्कमध्ये मीरा आणि सोनालीमध्ये मोठं भांडण झालं आहे. मीरा आणि सोनालीमध्ये हाणामारी का झाली? हे आजच्या भागामध्ये समजेलच पण, मीरा असं देखील म्हणताना दिसतेय की, ‘बिग बॉस मला हिच्यापासून धोका आहे.’ त्यावर विकास म्हणाला, ‘सोनाली ती नाटक करते आहे धरून ठेव तिला.’ त्यावर जय चिडून म्हणाला, ‘तू शांत बसं विकास.’ मीरा पुढे म्हणाली, ‘आई शप्पथ सांगते बिग बॉस प्लीज हे थांबवा, नाहीतर ही गेली आज.’

हेही वाचा: 'तुला परवानगी देणारा मी कुणीच नाही'; तिच्यासाठी सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट

याआधी टास्क दरम्यान विशाल आणि विकासमध्ये मतभेद झाले तर दुसरीकडे सोनाली आणि विकासमध्ये बाचाबाची देखील झाली, ज्यामध्ये सोनालीने विकासवर आरोप केला, ‘तू माझ्यासाठी खेळला नाहीस. पुढे ती असं देखील म्हणाली की, ‘पण मी तुझ्यासाठी नक्की खेळणार.’ तर काल कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी एकही सदस्य निवडला गेला नाही. कारण, दोन्ही टीममधील मतभेद आणि मारामारीमुळे तो टास्क रद्द करण्यात आला. यामध्ये दादूस, सोनाली, गायत्री आणि विकास हे सगळे सदस्य कॅप्टन्सीची उमेदवारी मिळवण्यास अयशस्वी ठरले.

loading image
go to top