'जगा सांगे तत्वज्ञान..'; जुन्या व्हिडीओमुळे शिवलीला होतेय ट्रोल

पहा शिवलीलाचा हा जुना व्हिडीओ
'जगा सांगे तत्वज्ञान..'; जुन्या व्हिडीओमुळे शिवलीला होतेय ट्रोल

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनमधील Bigg Boss Marathi 3 पहिला आठवडा चांगलाच गाजला. विविध क्षेत्रातील स्पर्धक बिग बॉसच्या घरात ९० दिवसांसाठी एकत्र आले आहेत. घरातील काही सदस्य अगदी पहिल्या दिवसापासूनच सोशल मीडियावर चर्चेत आहेत. स्नेहा वाघ, तृप्ती देसाई, मीरा जगन्नाथ, गायत्री दातार यांची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. यातच आता आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. बिग बॉसच्या घरातील शिवलीला पाटील Shivleela Patil सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. आधी शिवलीलाला बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाल्याबद्दल ट्रोल केलं गेलं. त्यानंतर आता एका जुन्या व्हिडीओमुळे तिच्यावर टीका केली जात आहे.

शिवलीलाच्या किर्तनाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पहायला मिळतात. मात्र या एका व्हिडीओमध्ये ती महिलांबद्दल बोलताना दिसतेय. आजकालच्या महिला पदर मागे, केस मोकळे सोडून वावरतात, असं ती या व्हिडीओत बोलताना दिसतेय. यावरूनच नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. बिग बॉसमधील शिवलीलाचं वागणं आणि व्हिडीओमधील हे वक्तव्य यांची तुलना नेटकरी करू लागले आहेत. 'जगा सांगे तत्वज्ञान, स्वत: कोरडे पाषाण' अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

'जगा सांगे तत्वज्ञान..'; जुन्या व्हिडीओमुळे शिवलीला होतेय ट्रोल
'अरे, कुठे नेऊन ठेवली ही मालिका'; 'अरुंधती'च्या वागण्यावर भडकले प्रेक्षक

कोण आहे शिवलीला पाटील?

पुरुषांचे क्षेत्र मानल्या जाणाऱ्या कीर्तन क्षेत्रात महिला कीर्तनकार म्हणून शिवलीला पाटील यांनी आपला ठसा उमटविला आहे. किर्तनकार शिवलीलाचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे शिवलीलाचे मूळ गाव. किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. शिवलीला ही कीर्तनकार बाळासाहेब पाटील यांची मुलगी आहेत. किर्तनाचे बाळकडू तिला त्यांच्याकडूनच मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com