'अरे, कुठे नेऊन ठेवली ही मालिका'; 'अरुंधती'च्या वागण्यावर भडकले प्रेक्षक

मालिकेचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून त्यावर अनेकांनी नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत.
new marathi serial aai kuthe kay karte on star pravah channel
new marathi serial aai kuthe kay karte on star pravah channel

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' Aai Kuthe Kay Karte या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेने टीआरपीचे नवीन विक्रम रचले. मात्र आता मालिकेतील अरुंधती या पात्राच्या वागण्यावरून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. गरजेपेक्षा जास्त चांगुलपणा दाखवणाऱ्या अरुंधतीवर नेटकऱ्यांनी टीका केली आहे. पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर अरुंधती आणि संजना एकाच घरात राहत आहेत. त्यातही घरातील सर्व जबाबदाऱ्या अजूनही अरुंधतीच पार पाडत आहे. संजनाला व्रतवैकल्यांची फारशी माहिती नसल्याने अरुंधती तिला मदत करत असते. असं असूनही संजनाचा मूळ स्वभाव काही बदलला नाही. ती पदोपदी अरुंधतीचा अपमान करू पाहतेय. आता आगामी भागात आणखी एका घटनेत अरुंधती संजनाची मदत करताना दिसणार आहे. मात्र हेच पाहून प्रेक्षकांना राग अनावर झाला आहे.

मालिकेचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून त्यावर अनेकांनी नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत. 'संजनाने घरातल्या सर्वांना हाकलून दिलं तरी अरुंधती तिला काही बोलणार नाही', असं एकाने म्हटलंय. तर 'अरे कुठे नेऊन ठेवली ही मालिका' अशा शब्दांत दुसऱ्याने टीका केली आहे. 'आम्ही बघणारे वेडे की दाखवणारे वेडे' असंही नेटकऱ्याने म्हटलं आहे. ज्या व्यक्तीमुळे आपला संसार मोडला, तिला एवढी मदत कुणीही करत नाही, असं म्हणत नेटकऱ्यांनी मालिकेची थट्टा उडवली आहे.

new marathi serial aai kuthe kay karte on star pravah channel
कॅमेरासमोर क्वचित येतात धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी; सनी देओलने पोस्ट केला व्हिडीओ

'आई कुठे काय करते' या मालिकेत अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर ही अरुंधतीची भूमिका साकारत आहे. तर मिलिंद गवळी अनिरुद्धच्या भूमिकेत आहेत. मालिकेत संजनाची नकारात्मक छटा असलेली भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले साकारत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com