esakal | "वैवाहिक आयुष्य इथे चघळत बसू नको"; महेश मांजरेकरांनी स्नेहाला सुनावलं
sakal

बोलून बातमी शोधा

sneha wagh and mahesh manjrekar

महेश मांजरेकरांनी स्नेहाला सुनावलं

BBM 3: "वैवाहिक आयुष्य इथे चघळत बसू नको"

sakal_logo
By
स्वाती वेमूल

Bigg Boss Marathi 3: 'बिग बॉस मराठी ३'मध्ये नुकत्याच पार पडलेल्या चावडी स्पेशल भागात सूत्रसंचालक महेश मांजरेकर Mahesh Manjrekar हे स्नेहा वाघ Sneha Wagh आणि आविष्कार दारव्हेकर यांच्यावर भडकल्याचं पहायला मिळालं. खासगी आयुष्यातील बाबींची चर्चा बिग बॉसच्या घरात करून प्रेक्षकांची सहानुभूती मिळवण्यावरून त्यांनी संताप व्यक्त केला. या आधीच्या काही भागात स्नेहाने घरातील इतर सदस्यांना आविष्कारच्या वागण्याबद्दल सांगितलं होतं. स्नेहाने तिचा पूर्वाश्रमीचा पती आविष्कार दारव्हेकर याच्यावर शारीरिक आणि मानसिक छळाचे आरोप केले होते. मात्र अशा गोष्टी घरात सांगून त्याद्वारे प्रेक्षकांकडून सहानुभूती मिळवण्याला मांजरेकर यांनी विरोध केला.

"टेलिव्हिजनवर अशा पद्धतीने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल सांगणं आणि समस्यांवर चर्चा करणं यांची गरज नाही," अशा शब्दांत मांजरेकर यांनी स्नेहाला सुनावलं. जे झालं ते झालं, तुझ्या वैवाहिक आयुष्यात जे काही घडलं त्याबद्दल तू घरातील सर्व सदस्यांना का सांगत फिरते, असा सवाल त्यांनी स्नेहाला केला. त्यासोबतच त्यांनी बिग बॉसच्या घरात वैवाहिक आयुष्यात आलेलं अपयश आणि पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल चर्चा टाळण्याची सक्त ताकीद दिली. प्रेक्षकांची सहानुभूती मिळवण्यासाठी हे सर्व करायची गरज नाही असं ते म्हणाले. स्नेहासोबतच त्यांनी सुरेखा कुडची यांनादेखील खडसावले. इतरांच्या खासगी आयुष्यात अधिक रस दाखवू नका, असं मांजरेकर त्यांना म्हणाले.

हेही वाचा: BBM 3: सूत्रसंचालनासाठी महेश मांजरेकरांना मिळतं इतकं मानधन

या भागात मांजरेकर यांनी आविष्कारलाही प्रश्न विचारला. "एके दिवशी तुला माझा अभिमान वाटेल असं काम मी करून दाखवेन", असं वचन स्नेहाला का दिलं, असा सवाल मांजरेकर यांनी केला. विभक्त झाल्यावर अशा गोष्टींची गरजच काय, असं विचारत त्यांनी आविष्कारला सुनावलं. तुम्ही दोघं वैयक्तिक पातळीवर हा खेळ खेळायला आला आहात, जोडीने नाही, याची आठवण त्यांनी स्नेहा आणि आविष्कारला करून दिली.

loading image
go to top