Bigg Boss Marathi 3: अखेर मीराच्या संयमाचा बांध तुटला! Meera Jagannath | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss Marathi 3: अखेर मीराच्या संयमाचा बांध तुटला!

Bigg Boss Marathi 3: अखेर मीराच्या संयमाचा बांध तुटला!

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनमध्ये स्पर्धकांनी नुकतेच ५० दिवस पूर्ण केले आहेत. दर आठवड्याला घरातील एक सदस्य बाहेर पडतोय. याच प्रक्रियेत रंगणाऱ्या विविध टास्कदरम्यान घरातील स्पर्धकांमध्ये भांडणं होत आहेत. बिग बॉस हा शो त्यामधील टास्क आणि टास्कदरम्यान होणाऱ्या भांडणांमुळे सतत चर्चेत असतो. अनेकदा काही गोष्टी या स्पर्धकांच्या सहनशक्तीपलीकडे जातात. सध्या असंच काहीसं मीरा जगन्नाथच्या Meera Jagannath बाबतीत घडलं आहे. मीरा आणि सोनाली यांच्यात झालेल्या वादानंतर मीराच्या संयमाचा बांध तुटला.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये मीरा आणि सोनाली एकमेकींवर ओरडताना दिसत आहेत. मीरा म्हणते, "जेव्हा काम करायचं असतं तेव्हा ही आजारी असते." सोनाली त्यावर म्हणाली, "डोक्यावरच बसते ही, काय करू मी? वेडी आहेस का तू?" शाब्दिक बाचाबाची करतानाच मीरा चक्क रडायला लागते. इतकंच नव्हे तर ती रागाच्या भरात जेलच्या दरवाजावर डोकं आपटताना दिसते.

हेही वाचा: हॉट दृश्यासाठी निर्मात्याला मल्लिकाच्या कमरेवर भाजायची होती चपाती

सोनाली आणि मीरामधील हा वाद कुठपर्यंत पोहोचणार, या दोघींमध्ये पुढे काय होणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पहायला मिळेल. या नव्या प्रोमोवर प्रेक्षकांनीही कमेंट्स केल्या आहेत. "मीराला अक्कल नाही. कॅप्टनशीपमध्ये लोकांना कसं सांभाळायचं हे तिला कळत नाही," असं एकाने म्हटलं. तर 'मीराचं नाटक सुरू झालं', अशी प्रतिक्रिया दुसऱ्या युजरने दिली.

loading image
go to top