esakal | 'बिग बॉस मराठी ३'च्या घरात दादा कोंडकेंचा नातू; कोण आहे तो स्पर्धक?
sakal

बोलून बातमी शोधा

dada kondke

'बिग बॉस मराठी ३'च्या घरात दादा कोंडकेंचा नातू; कोण आहे तो स्पर्धक?

sakal_logo
By
स्वाती वेमूल

वेगवेगळ्या स्वभावाची १५ माणसं 'बिग बॉस मराठी ३'च्या Bigg Boss Marathi 3 घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाले. स्नेहा वाघ, विकास पाटील, दादूस, उत्कर्ष शिंदे, सुरेखा कुडची अशी अनेक नावं यामध्ये आहेत. या स्पर्धकांमध्ये दिवंगत अभिनेते दादा कोंडके Dada Kondke यांचा नातूसुद्धा सहभागी आहे. दादा कोंडके यांचा एक विशिष्ट चाहतावर्ग आहे. त्यांच्या चित्रपटांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. फारच कमी लोकांना हे माहित असेल की अभिनेता अक्षय वाघमारे Akshay Waghmare हा दादा कोंडके यांचा नातू आहे.

एका मुलाखतीत अक्षय याविषयी म्हणाला, "दादा कोंडके माझे सख्खे आजोबा नाहीत. माझी आत्ते आजी ही दादा कोंडकेंच्या कुटुंबातील आहे. दादा कोंडके यांचे चित्रपट माझ्या घरात अनेक वर्षे पाहिली गेली. माझे वडील त्यांचे चाहते आहेत. मी मूळचा फलटणचा असून करिअरसाठी मुंबईला आलो. अभिनयाची इच्छा ही लहानपणापासूनच होती. मात्र इथे आल्यावर खूप स्ट्रगल करावा लागला."

हेही वाचा: आजोबा अरुण गवळी नातीच्या भेटीला; फोटो व्हायरल

अक्षय वाघमारेची दुसरी ओळख म्हणजे तो डॅडी अर्थात अरुण गवळी यांचा जावई आहे. अरुण गवळी यांची मुलगी योगिता गवळीशी अक्षयने लग्न केलं आहे. गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये दगडी चाळीत या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. योगिता आणि अक्षयच्या घरी नुकतंच चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. अक्षयने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. २०१९ मध्ये त्याला 'हॉटेस्ट मॅन ऑफ मराठी टीव्ही'चा किताब मिळाला होता.

loading image
go to top