Bigg Boss Marathi 3: 'मीराच्या जागी गायत्री घराबाहेर कशी गेली?'; नेटकऱ्यांचा सवाल

गायत्री दातारची बिग बॉस मराठीच्या घरातून एग्झिट
Mira Jagganath and Gayatri Datar
Mira Jagganath and Gayatri Datarfile view

बिग बॉस मराठी ३ (Bigg Boss Marathi 3) या कार्यक्रमात घरातील शेवटचं कॅप्टनपद मीनल शाहला मिळालं. तर नॉमिनेशन कार्यात गायत्री दातार, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, मीरा जगन्नाथ आणि सोनाली पाटील नॉमिनेट झाले. यामध्ये रविवारी पार पडलेल्या एपिसोडमध्ये सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी मीरा जगन्नाथ (Meera Jagannath) सुरक्षित असल्याचं घोषित केलं. तर गायत्री दातारचा (Gayatri Datar) बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला. कलर्स मराठी वाहिनीच्या इन्स्टाग्राम पेजवर याचा प्रोमो पोस्ट करण्यात आला असून अनेकांनी त्यावर मीराच्या विरोधात कमेंट्स केल्या आहेत. मीराच्या जागी गायत्री घराबाहेर कशी गेली, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.

'अयोग्य निर्णय, किमान आता तरी योग्य स्पर्धकाला वाचवा', असं एकाने म्हटलं. तर मीरापेक्षा गायत्री कित्येक पटींनी बरी आहे, असं काहींनी म्हटलं. 'मीरा गेली तर मांजरेकर सर काय बोलणार', असा उपरोधिक टोलासुद्धा एकाने लगावला. काहींनी गायत्रीच्या एलिमिनेशनवर आनंद व्यक्त केला. मात्र पुढील भागात मीरा घराबाहेर गेली पाहिजे, अशीही इच्छा व्यक्त केली.

Mira Jagganath and Gayatri Datar
21 वर्षांनंतर भारताकडे 'मिस युनिव्हर्स'; हरनाज संधूने कोरलं नाव

आता बिग बॉस मराठीच्या घरात ७ सदस्य उरले आहेत. 'ई टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार येत्या २६ डिसेंबर रोजी हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि एक स्पर्धक बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार आहे. या शोचे निर्माते सध्या ग्रँड फिनालेसाठी जोरदार तयारी करत आहेत. या सिझनच्या ग्रँड फिनालेमध्ये प्रेक्षकांना एक छोटासा बदलसुद्धा पहायला मिळणार आहे. पहिल्या दोन सिझनमध्ये पाच स्पर्धक ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचले होते. मात्र यंदाच्या सिझनमध्ये पाच नव्हे तर सहा स्पर्धक ग्रँड फिनालेपर्यंतचा प्रवास करणार असल्याचं कळतंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com