बिग बॉस मराठी ३: दुखावलेल्या विशालने घेतला मोठा निर्णय | Vishal Nikam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vishal Nikam

बिग बॉस मराठी ३: दुखावलेल्या विशालने घेतला मोठा निर्णय

Bigg Boss Marathi 3 बिग बॉस मराठी ३च्या घरात सध्या नॉमिनेशन एक्स्प्रेस कार्य रंगतंय. गेल्या आठवड्यात घरातील सदस्यांमध्ये बरेच वाद झाले. विकास आणि जय यांच्यामध्ये जोरदार भांडण झालं. तर टास्कदरम्यान सोनालीने मीराला हरवलं. गायत्री दातारला टास्क खेळताना दुखापत झाली आणि या दुखापतीचं टीम ए कडून भांडवल करण्यात आलं. यादरम्यान विशाल निकम Vishal Nikam आणि मीनल यांच्यामध्येही बाचाबाची झाली. बिग बॉसच्या चावडीवर सूत्रसंचालक महेश मांजरेकर Mahesh Manjrekar यांनी याच गोष्टीवरून विशालला दहावा नंबर दिला. सोनाली आणि मीनलसोबत विशाल नीट वागत नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या या टिप्पणीने विशाल दुखावला गेला आणि त्याने बिग बॉसच्या घरात महत्त्वाचा निर्णय घेतला.

मांजरेकरांच्या टिप्पणीवर विशाल म्हणतो, "माझ्या ग्रुपमधील एखादी व्यक्ती चुकत असेल तर मी त्याला समजवायला नको का?" त्यावरूनही मांजरेकर विशालला सुनावतात. या सर्व घडामोडींनंतर विशाल यापुढे कोणत्याच टीमसोबत खेळणार नसल्याचं जाहीर करतो. "जवळची माणसंच जास्त त्रास देतात. हे मला आणखी सहन होत नाही आता. माझं इथे कुणी नाही. मी कोणत्याच ग्रुपचा भाग नाही", असं तो एकट्यात बसलेला असताना बोलतो.

हेही वाचा: प्रियांकाच्या 'या' निर्णयामुळे घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; आई मधू चोप्राने दिली प्रतिक्रिया

विशालच्या या निर्णयावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. तर काहींनी त्याचं समर्थन केलं. 'थोडे दिवस तुला टिमसोबतच खेळावं लागेल, कारण एक वोट संपूर्ण खेळ बदलू शकतो,' असं एकाने म्हटलं. तर सहानुभूती मिळवण्यासाठी हा निर्णय घेतला, असं दुसऱ्याने लिहिलं. विशालच्या या निर्णयामुळे त्याला बिग बॉसच्या घरात अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

loading image
go to top