प्रियांकाच्या 'या' निर्णयामुळे घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; आई मधू चोप्राने दिली प्रतिक्रिया | Priyanka Chopra | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka Chopra, Nick Jonas

प्रियांकाच्या 'या' निर्णयामुळे घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; आई मधू चोप्राने दिली प्रतिक्रिया

सोशल मीडियाने चाहते आणि सेलिब्रिटी यांच्यामधील दरी कमी केली. सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यातील बऱ्याच घडामोडी चाहत्यांना त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून समजतात. मात्र या अकाऊंटमध्ये केलेला छोटा बदल किंवा घेतलेला महत्वपूर्ण निर्णय यांमुळे चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण यायला वेळ लागत नाही. अशीच काहीशी घटना बॉलिवूडची 'देसी गर्ल' अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा Priyanka Chopra सोबत घडली आहे. प्रियांका आणि तिचा पती निक जोनास Nick Jonas यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. यामागचे कारण म्हणजे प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये केलेला छोटासा बदल. प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून जोनास हे आडनाव काढून टाकलं आहे. त्यामुळे प्रियांका आणि निक यांच्यामध्ये काहीतरी बिनसलंय अशी चर्चा होत आहे. यावर आता प्रियांकाची आई मधू चोप्रा Madhu Chopra यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Priyanka Nick divorce rumours

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत मधू चोप्रा यांनी प्रियांकाच्या घटस्फोटाच्या चर्चा खोट्या आणि तथ्यहीन असल्याचं स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे अशा अफवा पसरवू नका अशीही विनंती त्यांनी नेटकऱ्यांना केली.

प्रियांकाची मुंबईमधील खास मैत्रिणीनेही यावर प्रतिक्रिया दिली. इ टाइम्सला दिलेला मुलाखतीत ती म्हणाली, अशा अर्थहीन चर्चांवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर जे फॉलोवर्स असतात त्यांना अती विचार करायची सवय असते असेही ती म्हणाली.

हेही वाचा: 'याला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार', महेश मांजरेकरांवर नेटकरी चिडले

निक आणि प्रियांकाने नुकतंच नवीन घर घेतलं असून या घरात दोघं राहायला गेले आहेत. घराचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या नव्या घरातच प्रियांका आणि निकने दिवाळी साजरी केली होती. या दोघांनी १ डिसेंबर २०१८ रोजी राजस्थानमध्ये लग्न केलं. लग्नानंतर प्रियांका निक सोबत अमेरिकेत राहायला गेली.

प्रियांका लवकरच एका बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फरहान अख्तर दिग्दर्शित या चित्रपटाचं नाव जी ले जरा असं आहे. यामध्ये तिच्यासोबत आलिया भट्ट आणि कतरिना कैफ मुख्य भूमिका साकारणार आहेत.

loading image
go to top