Bigg Boss Marathi 4: महेश मांजरेकरांनी सांगितले राग शांत करण्याचे १०१ उपाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bigg boss marathi season 4 promo out mahesh manjrekar

Bigg Boss Marathi 4: महेश मांजरेकरांनी सांगितले राग शांत करण्याचे १०१ उपाय

big boss marathi : 'बिग बॉस मराठी' म्हंटलं की स्पर्धक, त्याच्यातील वाद, भांडणं आणि राडा. पडद्यावर दिसणारे कलाकार बाहेर कसे असतात, वागतात हे या कार्यक्रमामुळे समोर येते त्यामुळेच बिग बॉस मराठीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. जेवढे स्पर्धक राडा घालतात त्याहून अधिक राडा महेश मांजरेकर आठवड्याच्या शेवटी घालतात. त्यात्या आठवड्यात झालेल्या चुकांवर बोलताना त्यांचा पारा चढलेला असतो म्हणून यंदा ते राग शांत करण्याचे १०१ उपाय घेऊन आले आहेत. (bigg boss marathi season 4 promo out mahesh manjrekar)

'बिग बाॅस मराठी'(Bigg Boss marathi season 4 ) या अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमाचे तीन पर्व गाजल्यानंतर आता चौथे पर्व लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना अधिकच उत्सुकता लागली आहे. लवकरच हे पर्व सुरू होणार असून, त्याचं दुसरा प्रोमो नुकताच समोर आला आहे. (colors marathi announced mahesh manjrekar host bigg boss marathi season 4)

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर राग शांत करण्याच्या 101 उपायांविषयी बोलत आहेत. मांजरेकर म्हणत आहेत, 'यावेळी विचार करतोय शांतपणे होस्ट करायचं. चिड चिड करायची नाही.' मांजरेकर असं म्हणताना हसत आहेत. त्यामुळे मांजरेकर आता चावडीवर स्पर्धकांची शांतपणे शाळा घेणार का? की नेमही प्रमाणेच सगळ्यांची खरडपट्टी काढणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोण करणार हा मोठा प्रश्न चाहत्यांना पडला होता. सिद्धार्थ जाधव याचेही नाव चर्चेत होते. पण वाहिनीने काही दिवसांपूर्वी एक प्रोमो रिलीज केला आणि महेश मांजरेकरांच्या नावाची घोषणा केली. आता उत्सुकता आहे ही या कार्यक्रमात कोणते स्पर्धक सहभागी होणार आहे याची. या शो साठी अनेक नावे चर्चेत आहेत, पण नेमकं कोण सहभागी होणार हे अद्याप कळलेले नाही. सप्टेंबर अखेरीस हा सीजन सुरू होणार असल्याची चर्चा आहे, त्यामुळे प्रेक्षक आता त्या दिवसाची वाट पाहत आहेत.

Web Title: Bigg Boss Marathi 4 महेश मांजरेकरांनी सांगितले राग शांत करण्याचे १०१

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..