Bigg Boss Marathi 4: विजेतेपद हुकल्यावर काय वाटतंय अपूर्वाला?, फिनालेनंतर नेमळेकरची पहिली पोस्ट चर्चेत

बिग बॉस मराठी ४ ची विजेती अपू्र्वाच होणार असं अनेकांना वाटत होतं पण आयत्यावेळेस गेम पलटला.. आता फिनालेनंतर अपू्र्वाची पहिली पोस्ट चर्चेत आलीय.
Bigg Boss Marathi 4: Apurva Nemlekar Post after Finale
Bigg Boss Marathi 4: Apurva Nemlekar Post after FinaleInstagram

Marathi Bigg Boss 4: बिग बॉसचा यंदाचा सिझन गाजवणाऱ्यांमध्ये अपूर्वा नेमळेकर हे नाव वरच्या क्रमांकावर घेतलं पाहिजे. अपूर्वाची 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील शेवंता भूमिकेमुळे जनमानसात आधीपासूनच क्रेझ होती. त्याचा तिला घरात गेल्यावर नक्कीच फायदा झाला.

पण अपूर्वानं आपल्या बाहेरील इमेजच्या आधारे घरातली इमेज बनवली नाही. तर घरातही तिनं 'मी जशी आहे तशीच राहणार..' हा अॅटिट्युड ठेवून आपलं असं वेगळं स्थान निर्माण केलं. अपूर्वाच जिंकणार असं लोकांना वाटत असताना थोडक्यासाठी तिला विजेतेपदाने हुलकावणी दिली...

अन् हा तिच्यासोबत तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का होता. फिनालेनंतर आता तिनं पहिली पोस्ट केलीय ही त्यामुळेच सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. काय म्हणाली आहे अपूर्वा?(Bigg Boss Marathi 4: Apurva Nemlekar Post after Finale)

Bigg Boss Marathi 4: Apurva Nemlekar Post after Finale
Bigg boss marathi: अक्षय केळकरने कोरले बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव, मिळाली इतकी रक्कम

अपूर्वानं बिग बॉस मराठीच्या घरात तब्बल ९० दिवस राहून आल्यावर नुकताच लोकांशी आपल्या पोस्टच्या माध्यमातून संवाद साधला आहे. यशानं थोडक्यात हुलकावणी दिल्यानंतर आपल्याला कदाचित अपूर्वाची भावूक पोस्ट अपेक्षित असेल. पण तिनं तिच्या पोस्टमध्ये कुठेही हरल्याचा उल्लेख न करता किंवा भावूकतेचा पोस्टमध्ये जरादेखी आव न आणता स्पोर्टिंग स्पिरीट दाखवणारी पोस्ट केली आहे.

फिनालेचा सोहळा आटोपल्यावर उपविजेती म्हणून घराबाहेर पडल्यावर आपल्या पहिल्या-वहिल्या पोस्टमध्ये अपूर्वा नेमळेकरनं लिहिलं आहे की,''बिग बॉस चा प्रवास खडतर होता पण खूप काही शिकवून जाणारा देखील होता खेळात किंवा भांडणात नेहमीच चर्चेत राहून प्रेक्षकांची मन मी जिंकली आणि घरातला खेळ देखील जिंकत आले आहे म्हणून तुमचं हे प्रेम असच कायम राहू द्या आणि माझ्या पुढील प्रवासासाठी अश्याच शुभेच्छा मला देत रहा''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com