Bigg Boss Marathi 4: परत वजनावरून बोल, मग तुला सांगते.. अपूर्वाने अमृताची.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss Marathi 4 apurva nemlekar slams amruta dhongade on body shaming

Bigg Boss Marathi 4: परत वजनावरून बोल, मग तुला सांगते.. अपूर्वाने अमृताची..

bigg boss marathi 4: सध्या बिग बॉस मराठीच्या घरात रोज नवा ट्विस्ट येत आहे. बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरू होऊन आता तीन आठवडे झाले आहेत. घरामध्ये रोज नवीन वाद, नवा राडा होत आहे. आठवड्याभरात स्पर्धकांनी कितीही राडा घातला तरी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात ती बिग बॉसच्या चावडीची. महेश मांजरेकर सदस्यांची कशी शाळा लावतात हे पाहण्यासाठी सारेच उत्सुक असतात. कालच चावडीला सुरुवात झाली. आज याच चावडीचा भाग असलेला 'चुगली'चा डाव रंगणार आहे. यावेळी एक चुगली ऐकून अपूर्वाचा अक्षरशः तीळपापड झाला.

(Bigg Boss Marathi 4 apurva nemlekar slams amruta dhongade on body shaming)

हेही वाचा: Urfi javed: उर्फीनं दिवाळी केली हॅप्पी, कपडे काढून दिल्या शुभेच्छा..

शनिवार आणि रविवार ही बिग बॉस (bigg boss marathi)च्या घरातील अत्यंत रंगतदार भाग असतात. महेश मांजरेकर यांनी स्पर्धकांना केलेलं मार्गदर्शन आणि चुकांवरून सुनावलेले खडेबोल ऐकायला प्रेक्षक आतुर असतात. कालच्या म्हणजे शनिवरच्या भागात मांजरेकरांनी अपूर्वापासून ते योगेश, विकास, किरण सर्वांचीच बोलती बंद केली. आता असणार आजचा चुगलीचा भाग. ज्यामध्ये आपल्या पाठीमागे आपलयाविषयी कोण के बोलतय ही प्रेक्षकांच्या माध्यमातून उघड होतं.

हेही वाचा: Har Har Mahadev: हर हर महादेव चित्रपट वादात, चुकीचा इतिहास पसरवला जात असल्याने आक्षेप

आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अपूर्वाला एक चुगली येते. ज्यामध्ये अमृता धोंगडे अपूर्वाच्या लठ्ठपणावरून कुणाकडे बोलत असल्याचे सांगितले आहे. ही चुगली वाचताच अपूर्वाचा पारा चढतो. कारण तिला कुणाच्याही तब्येतीवरून, व्यंगावरून बोललेलं आवडत नाही. या आधीही तिने योगेशची बाजू घेताना अनेकदा नमूद केलं आहे. पण ही तिच्याच बाबतीत झाल्याने तिचा संताप झाला आहे. तिने अमूर्ताला अक्षरशः कठोर शब्दात सुनावले आहे.

'या पुढे जर तू माझ्या तब्येतीवरून बोललीस तर तुला खूप महागात पडेल' असं अपूर्वा अमूर्ताला सांगते. त्यावर अमृता म्हणते, 'मी बोलणार.. बघू तू काय करतेय' यावर अपूर्वा म्हणजे 'तू फक्त बोल.. मग बघ त्यावेळी काय होतंय'.. या वादात मांजरेकरही पडतात. ते देखील अमृताला ही चुकीच असल्याचं सांगतात. आता अपूर्वा आणि अमृता यांच्यामध्ये अजून काय वाद रंगतोय. ही आजच्या भागात कळेल.

टॅग्स :Big Bossbigg boss marathi