Bigg Boss Marathi 4: मी नाय त्यातली, कडी लाव आतली.. तेजस्विनी-अपूर्वामध्ये खडाजंगी.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss Marathi 4 captaincy task apurva nemlekar and tejaswini lonari fight

Bigg Boss Marathi 4: मी नाय त्यातली, कडी लाव आतली.. तेजस्विनी-अपूर्वामध्ये खडाजंगी..

bigg boss marathi S 4: बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात आज पुन्हा एकदा कॅप्टनसी टास्क होणार आहे. हा टास्क आहे की युद्ध असा प्रश्न हा टास्क पाहिल्यावर प्रेक्षकांना पडेल. अत्यंत खडतर अशा या टास्क मध्ये खेळण्यासाठी स्पर्धक जीवाची पर्वा न करता भिडताना दिसतील. कारण सध्या प्रत्येकालाच कॅप्टन होऊन पुढच्या आठवड्यासाठी सेफ व्हायचं आहे. त्यामुळे आज घरात टास्क कमी युद्धच रंगताना दिसणार आहे.

(Bigg Boss Marathi 4 captaincy task apurva nemlekar and tejaswini lonari fight)

हेही वाचा: Salim Khan Birthday: पत्नी, चार मुलं, घरातून विरोध असतानाही हेलनच्या प्रेमात वेडे होते सलीम खान..

बिग बॉसच्या घरात काल किरण मानेची पुन्हा एंट्री होताच सगळी समीकरणं बदली. तीन दिवस गुप्त खोलीत बसलेला किरण काल घरात आला आणि काहींचे चेहरे उतरले तर काहींनी आनंदाने उड्या मारल्या. किरण येताच अमृता धोंगडे आणि तेजस्विनी मध्ये कडाक्याचं भांडण झालं.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: Aai Kuthe Kay Karte: अरुंधती-आशुतोषच्या नात्यात वादळ? अभिनेत्री स्वरांगी मराठेची एण्ट्री

ज्यामध्ये अमृता म्हणून गेली, घरातसगळ्यात सेफ गेम खेळणारी व्यक्ती म्हणजे “तेजस्विनी लोणारी" आहे. तेजस्विनी म्हणाली, 'माझी चूक होते मी तुझ्याकडे नेहेमी येते...' तर काल घरात परतल्यावर किरण माने यांनी सदस्यांना दिलेल्या १ ते १० या क्रमवारीनुसार त्यांची जागा दाखवून दिली. बिग बॉस यांनी जाहीर केले किरण माने यांनी निवडलेल्या १ ते ५ क्रमावर असलेल्या सदस्यांना कॅप्टन पदाची उमेदवारी मिळत आहे.

तेजस्विनी, रोहित, विकास, अपूर्वा आणि समृद्धी यांना कॅप्टन्सीची उमेदवारी मिळाली त्यातून काल विकास आणि समृद्धी बाहेर पडले. आता खरी स्पर्धा आहे ती अपूर्वा आणि तेजस्विनी मध्ये. कारण कॅप्टनसीचा टास्क नाही तर जवळपास युद्धच त्या खेळणार आहेत. त्यामुळे कोण बनणार या आठवड्याचा कॅप्टन याची उत्सुकता प्रत्येकालाच लागली आहे. त्यामुळे "युध्द्व कॅप्टन्सीचे" हे कॅप्टन्सी कार्य कोण यशस्वी करतय ही आजच्या भागात कळेल. पण तोवर किरण माने कॅप्टन म्हणून घराचा कार्यभार सांभाळतील असे देखील बिग बॉस यांनी जाहीर केले आहे.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये टास्क दरम्यान अपूर्वा आणि तेजस्विनीची शाब्दिक चकमक बघायला मिळणार आहे. अपूर्वा म्हणाली, एकच स्ट्रॅटेजी आहे आयुष्यभर डिस्ट्रॉय... तेजस्विनी म्हणाली, तोंड सांभाळ तुझं... अपूर्व म्हणाली, चिटर आहे चिटर तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तेजस्विनी म्हणाली, हिडीस बाई दिसते आहे, गप्प बस. त्यावर अपूर्वा तिला म्हणाली, तू म्हणजे, 'मी नाही त्यातली, कडी लाव आतली.. अशी आहेस..' आता बघूया हे भांडणं अजून किती पुढे गेलं ते आजच्या भागामध्ये कळेल.

टॅग्स :Big Bossbigg boss marathi