Bigg Boss Marathi 4: अपूर्वाचं जुळलं, अमृताचं वाजलं, बिग बॉसच्या घरात राडा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss Marathi 4 day 11 apurva mimics Ruchira and amruta fights with yashashri

Bigg Boss Marathi 4: अपूर्वाचं जुळलं, अमृताचं वाजलं, बिग बॉसच्या घरात राडा!

bigg boss marathi 4 : बिग बॉस मराठी'चा खेळ म्हणजे टास्क, वाद, भांडण आणि राडे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाला सुरुवात होऊन 10 दिवस उलटले असून आता घरी मजा घेऊ लागली आहे. कोण आपल्यावर गेम करतंय, कोण मनापासून साथ देतय याची प्रचिती स्पर्धकांना येऊ लागली आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे घरात लवकरच गट पडतील असेल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आता घरात खरे ट्विस्ट येतील असे दिसते आहे. आज या घरात वेगळंच चित्र बघायला मिळणार आहे. नेहमी वादात अडकणारी अपूर्वा आज चक्क रुचिराची मिमीक्री करून हसवताना दिसणार आहे तर नेहमी आनंदी असणारी यशश्री आज तावतावाने भांडताना दिसणार आहे. (Bigg Boss Marathi 4 day 11 apurva mimics Ruchira and amruta fights with yashashri)

हेही वाचा: Urfi Javed: प्री-बर्थडे सेलिब्रेशनवेळी उर्फीला अश्रु अनावर.. नेमकं घडलं तरी काय?

बिग बॉस मराठी (bigg boss marathi) च्या घरामध्ये आज अपूर्वा आणि रोहित मिळून रुचिराची चांगलीच शाळा घेणार आहेत. रोहित आणि अपूर्वा रुचाराची नक्कल करताना दिसणार आहेत. या भागात रोहित अपूर्वला सांगतो, 'हिला कधी पण काहीही सुचतं, तू हिला चॅलेंज करू शकत नाही. हीच सगळं अपरंपार असतं.' तर अपूर्वाने रुचिरा समोर माघार घेतल्याचं कबूल केलं. तर रोहित म्हणाला, 'तिला भांडताना बघायचं "एक मिनिटं" मला बोलायचं आहे. त्यावर अपूर्वा म्हणाली.. नाही तिचं असं असतं "आता माझं ऐकायचं..' असे म्हणत रुचिराची चांगलीच खिल्ली उडवतात. या आनंदांच्या क्षणासोबत आज राडेही होणार आहेत.

तर 'हि पोरगी एवढी खोटारडी आहे' म्हणत अमृता धोंगडे यशश्री मसुरकर वर बरसणार आहे. अमृता धोंगडे आणि याश्री मसुरकर यांच्यामध्ये चहा बनवण्यावरून राडा होणार आहे. कोण खरं आणि कोण खोटं बोलतं आहे ते कळेलच. पण, सकाळची सुरुवात यांच्यातील खंडाजंगीने होणार. यशश्रीचे म्हणणे आहे, "मी तेजुला सांगितलं मला सकाळचा चहा लागतो, माझी कामं झाली आहेत तर तू करून देशील का? त्यावर तेजस्विनी ठीक आहे म्हणाली. मी अमृताला बोलले.. मी तेजुला सांगितलं आहे चहा बनवायला, कारण सकाळचं जरा,' त्याच्यावरूनच वाद सुरू झाला. यशश्री अमृताला म्हणाली, जरा बाहेर जाऊन बघ तू... आणि हे ऐकताच अमृता म्हणाली, "आई शप्पथ, माझं जेवण समोर आहे आयुष्यात मी खोटं नाही बोलणार, सॅम हि पोरगी एवढी खोटारडी आहे, ही काय बोली मी तुला सांगू..'' आता अमृता नेमकं काय सांगणार, आणि कसा वाद रंगणार.. हे आजच्या भागात कळेल.

टॅग्स :Big Bossbigg boss marathi